

खोपोलीतील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर कुटुंबीयांनी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
घटनेनंतर नऊ दिवसांनी मंगेश काळोखे यांच्या पत्नी, मुली आणि नातेवाईकांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली.
या हत्येने रायगड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी जोर धरत आहे.
Raigad News : रायगडच्या खोपोलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नवनिर्वाच नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचा आजचा (ता.३) नववा दिवस असून काळोखे कुटुंबांनी एकत्र येत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी मंगेश काळोखेंच्या दोन्ही मुलींनी केलेला आक्रोश मन पिटाळून टाकणारा होता. तसेच यावेळी न मुलींनी आणि त्यांचे पुतण्याने आरोपींना शिक्षा देण्याची मागणी मागणी करत प्रसार माध्यमांशी पहिल्यांदाच बोलले. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीत धक्कादायक खुलासा केला असून यामुळे आता या हत्या प्रकरणात पुन्हा राजकीय वळण येण्याची शक्यता आहे.
मंगेश काळोखे यांची ९ दिवसांपूर्वी मुलींना शाळेत सोडून येत असताना पाच ते सहा जणांनी रस्त्यात त्यांची निर्घृण केली होती. या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण अद्याप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि भगत फरार आहेत. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या विनय चव्हाण या मारेकऱ्यालाही अटक न झाल्याने काळोखे यांच्या कुटुंबानी संताप व्यक्त केला आहे. आता ९ व्या दिवशी दिवंगत काळोखे यांच्या मुलींनी आक्रोश करताना, दोन्ही मुलींना आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली होती असा धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे रायगडसह राज्यभर खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या, पहिल्यांदाच लेकी
काळोखे यांच्या हत्येच्या ९ व्या दिवशी दोन्ही मुली पहिल्यांदाच म्हणाल्या की, आम्हाला आमच्या बाबांचा चेहरा सुद्धा दाखवला नाही, त्यांची काय चुक होती. बाबांना रुग्णालयातून आणलं तेव्हाही ते कापडातच होते. त्यांचा शेवटचा चेहरा सुद्धा आम्हाला दाखवला नाही किंवा आम्हाला तो बघता आला नाही. आमच्या बाबांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे. यावेळी केलेला आक्रोश उपस्थितीतांचे डोळे पाणावून सोडणारा होता.
दोन्ही भयभीत...
मयत मंगेश काळोखे यांची छोटी मुलगी आर्या सातवीला असून मोठी मुलगी वैष्णवी दहावीत शिकत आहे. या दोन्ही मुलींना शाळेत सोडण्यासाठीच सकाळी ते गेले होते. यानंतर घरी परत येतानाच जयाबार समोर त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या दोन्ही भयभीत झालेल्या दिसल्या.
मुलींची शेवटची भेट...
यावर आज त्या बोलत्या झाल्या असून त्या म्हणाल्या, माझे बाबा मला शाळेत सोडायला गेले होते. पण, नंतर ते दिसलेच नाहीत. मला बाय केलं आणि ते आता कायमचेच निघून गेले. आता ते परत कधी येणार नाहीत. माझ्या बाबांना मारणाऱ्यांना फाशीच झाली पाहिजे, असं आर्याने म्हटलं आहे.
...आतापर्यंत ९ जणांना अटक
शिवसेनेचे कार्यकर्ते मंगेश काळोखे यांची २६ डिसेंबर रोजी अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून खोपोली नगरपालिकेच्या मतदानानंतर ती झाली. तर त्यांची पत्नी मानसी काळोखे निवडणूक आल्यानंतरच येथे वादाचा स्फोट झाला. ज्यानंतर ५ जणांनी काळोखे यांचा पाठलाग करून तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार करत त्यांची हत्या केली.
त्यांनी जागेवर प्राण सोडल्यानंतरही मारेकरी त्यांच्यावर वार करतच होते. आता या हत्येप्रकरणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांच्यासह ९ जणांवर गुन्हे दाखल आहे. तर एकूण ९ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
Q1. मंगेश काळोखे यांची हत्या कधी झाली?
➡️ शुक्रवारी सकाळी सुमारे 7 वाजता ही हत्या करण्यात आली होती.
Q2. मंगेश काळोखे कोण होते?
➡️ ते खोपोलीतील शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि सक्रिय कार्यकर्ते होते.
Q3. कुटुंबीयांची मुख्य मागणी काय आहे?
➡️ सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी ठाम मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
Q4. या प्रकरणात अटक झाली आहे का?
➡️ होय, काही आरोपींना अटक झाली असून उर्वरित आरोपींवरही कठोर कारवाईची मागणी आहे.
Q5. या घटनेचा रायगड जिल्ह्यावर काय परिणाम झाला आहे?
➡️ संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.