वाराणसीः उत्तरप्रदेशात विधानसभेच्या (UP Assembly Election 2022)सातव्या आणि शेवटच्या टप्यातील मतदानाला सुरवात झाली आहे. शेवटच्या टप्प्यात 2 कोटी 5 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर, सातव्या टप्प्यात 613 उमेदवार रिंगणात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघात मतदारांना मिळालेल्या एका आमंत्रण पत्रिकेची चर्चा सध्या समाज माध्यमावर सुरु आहे. ही आमंत्रण पत्रिका व्हायरल होत आहे.
मतदारराजाने मतदानाला यावे, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ही विशेष आमंत्रण पत्रिका मतदारांना पाठविली आहे. ''मतदान करण्याचे विसरु नका, मतदान तारीख, वेळ लक्षात ठेवा,'' असे या आमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे. ''मतदान करा, देशाचे जबाबदार नागरिक व्हा,'' असे आवाहन या पत्रिकेत करण्यात आले आहे.
आज होणाऱ्या निवडणुकीत योगी सरकाच्या सहा मंत्र्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi)यांचा वाराणसी लोकसभा मतदार संघात आठ जागांवर, तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा आझमगड मतदार संघात आज निवडणूक होत आहे. त्याचे भवितव्य आज ईव्हीएम (EVM)मशिनमध्ये कैद होणार आहे. या टप्यात अनेक महत्वाचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील 54 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. निवडणूक आयोगाने 12 हजारांहून अधिक मतदान केंद्रं आणि 23 हजारांहून अधिक मतदान स्थळं स्थापन केली आहेत. मतदानाच्या ठिकाणी संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर, पीपीई किट आणि मास्कची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाराणसी, गाझीपूर, चंदौली, जौनपूर, आझमगड, मऊ, मिर्झापूर, सोनभद्र आणि भदोही या नऊ जिल्ह्यांतील 54 जागांसाठी मतदान होणार आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत सातव्या टप्प्यातील या 54 जागांपैकी भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष अपना दल (S) आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष (SubhSP) यांना एकूण 36 जागा मिळाल्या होत्या. सातव्या टप्यात १७० उमेदवारांवर गंभीर गु्न्हे दाखल झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.