Varun Gandhi : भाजपचे खासदार वरुण गांधी हे आपल्याच पक्षावर मागील काही दिवसांपासून नाराज आहेत, भाजप पक्षाच्या विपरित अनेक विधाने त्यांनी केली आहेत, यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप त्यांना उमेदवारी मिळणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सद्या तरी याबाबत कसलीही स्पष्टता नाही. परंतु वरूण गांधी काँग्रेसमध्ये जातील अशीही शक्यता वर्तवली जात आहे. वरुण गांधी आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अलीकडील काही वक्तव्यात काही अंशी साम्यता दिसून येत आहे.
'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधी हिंदू-मुस्लिम मुद्द्याबाबत थेट माध्यमांवर निशाणा साधत असतानाच, वरुण गांधी यांनीही गेल्या महिन्याच्या अखेरीस दिलेल्या भाषणात 'हिंदू-मुस्लिम' असा उल्लेख करत माध्यमांवर हल्ला चढवला. याशिवाय वरुणने नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून सांगितले की, केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी केलेल्या घोषणा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. आपल्याच सरकारवर टीका करण्यात ते कुठलीही कसर सोडत नसल्याचे, त्यांच्या ताज्या वक्तव्यांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
'भारत जोडो यात्रे'दरम्यान राहुल गांधी हिंदू-मुस्लिम मुद्द्याबाबत थेट माध्यमांवर निशाणा साधत असतानाच, वरुण गांधी यांनीही गेल्या महिन्याच्या अखेरीस दिलेल्या भाषणात 'हिंदू-मुस्लिम' असा उल्लेख करत माध्यमांवर हल्ला चढवला. याशिवाय वरुणने नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून सांगितले की, केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी केलेल्या घोषणा त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. आपल्याच सरकारवर टीका करण्यात ते कुठलीही कसर सोडत नसल्याचे, त्यांच्या ताज्या वक्तव्यांवरून स्पष्टपणे दिसून येत आहे.
काँग्रेसमध्ये जाण्याची अधिक शक्यता का?
खात्रीशीर सुत्रांच्या माहितीनुसार, वरुण गांधी हे त्यांची चुलत बहीण प्रियंका गांधी यांच्याशी चर्चा करत आहेत. यापूर्वी दोघे भाऊ-बहीण फक्त कुटुंबाविषयीच बोलायचे, मात्र आता त्यांचा संवाद शक्यतांच्या राजकारणाबाबतही होत असल्याचे समजते. वरुण गांधींनी भाजपशी संबंध तोडले तर त्यांच्यासाठी अनेक पक्षांचा पर्याय खुले आहेत. समाजवादी पार्टी, आरएलडी, बसपा यांसारखे पक्ष वरुण गांधींना आपल्या पक्षात घेण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु या प्रादेशिक पक्षांपेक्षा वरुण गांधी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षात जाण्यास अधिक रस दाखवण्याची शक्यता आहे.
मागील काही काळापासून काँग्रेसची ताकद कमी झाली असली तरी, भाजपनंतर सर्वाधिक खासदार असलेला पक्ष काँग्रेस हाच पक्ष आहे. उत्तर प्रदेशात सपा आणि बसपच्या तुलनेत काँग्रेसची स्थिती कमकुवत आहे, असे असले तरी अनेक हिंदी पट्ट्यामधील राज्यांमध्ये पक्ष अजूनही मजबूत स्थितीत आहे. अशा स्थितीत वरुण यांची काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता अधिक जास्त आहे.
वरुण गांधी आल्याने काँग्रेसला काय फायदा होणार?
गांधी घराण्यातील असूनही वरुण आणि राहुल गांधी यांच्यात विचारसरणीत मोठा फरक आहे.मात्र, गेल्या काही वर्षांत वरुण गांधींचा स्वभावात खूप बदल आहे. आता ते भाजप सरकारवर थेट हल्ला करत आहेत. ते नेहमी म्हणतात की, "मी ना काँग्रेसच्या विरोधात आहे, ना पंडित नेहरूंच्या विरोधात. देशाला जोडण्याचे राजकारण व्हायला हवे, फाळणीचे नाही."
आगामी काळात वरुण गांधींनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास केवळ वरुण गांधींनाच नव्हे, तर काँग्रेसलाही याचा राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश सारखे महत्त्वाचे राज्य, पंतप्रधान बनण्याचा मार्ग उत्तर प्रदेशामधून जातो, असे म्हटले जाते, तिथे पक्ष वरुण गांधींचा वापर करू शकतो. एक धडाकेबाज आणि तरुण चेहरा म्हणून वरुण गांधी यूपीमध्ये काँग्रेसला पुढे नेऊ शकतो आणि यामुळे या राज्यात काँग्रेसचा काही अंशी स्थिती सुधारू शकते.
वरुण गांधी उत्तर भारतातील मोठा चेहरा :
भविष्यात वरुणगांधी काँग्रेसकडे आल्यास काँग्रेसला हिंदी पट्ट्यात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चांगले नेतृत्व मिळेल. राहुल गांधींनी दक्षिणेकडील राज्यांची कमान हाती घेतल्यास वरुण आणि प्रियंका गांधी यांच्याकडे उत्तर भारताची जबाबदारी येऊ शकते. याचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. वरुण गांधी हे उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहेत.
दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत प्रियांकाने प्रचार करून पक्षाला बहुमत मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांना बंधू वरुण यांचीही साथ मिळाल्यास काँग्रेससाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. मात्र, वरुण गांधींबाबतची परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत हे सर्व सांगणे घाईचे आहे. अशा परिस्थितीत वरुण कोणतेही मोठे पाऊल उचलतात की भाजपमध्ये राहून आपल्याच सरकारवर हल्ला चढवतात, हे येत्या काही दिवसात पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.