Telangana Politics : भाजपने फोडला 'बीआरएस'चा हुकमी एक्का, मुख्यमंत्री केसीआर यांना झटका!

Telangana Politics : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खम्मम मतदारसंघामधून श्रीनिवास रेड्डी हे तेलंगण राष्ट्र समितीचे राज्यातील एकमेव खासदार राहिले होते.
Ponguleti Srinivas Reddy BRS
Ponguleti Srinivas Reddy BRSSarkarnama

Ponguleti Srinivas Reddy : एकीकडे महाराष्ट्रात ठाकरे व शिंदे गटात सत्तासंघर्ष होत असताना शेजारील तेलंगणामध्ये भाजपने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना जोरदार झटका दिला आहे. बीआरएस यांच्या भारत राष्ट्र समिती यांच्या पक्षाला मोठा सुरूंग लावला आहे. टिआरएसचे दिग्गज नेते आणि खम्मम लोकसभा मतदासंघाचे माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे आता भाजपाच्या वाटेवर असल्याचे समजते आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट रेड्डी १८ जानोवारीला भेट घेणार आहेत.

माजी खासदार रेड्डी आणि शाह यांच्या या नियोजित भेटीमुळे केसीआरचे राजकीय गणित बिघडू शकते, अशी राजकीय तज्ञांचे मत आहे. श्रीनिवास रेड्डी सारख्या मातब्बर नेत्याला आपल्या पक्षात आणण्यात आता भाजपला य़श येताना दिसत आहे. तेलंगणातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रेड्डी यांच्या रूपाने, भाजपसाठी मोठी संधी चालून आली आहे.

Ponguleti Srinivas Reddy BRS
Congress News : काँग्रेसकडून पटोलेंना नाराळ देण्याची तयारी? ठाकूर, केदार अन् थोपटेंपैकी कुणाला लागणार लॉटरी

जानेवारीच्या 16 व 17 तारखेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक संपन्न झाल्यानंतर ते भाजप वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहेत.मागील काही दिवसांपासून श्रीनिवास रेड्डी भाजपमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर त्यांचा पक्षप्रवेश जवळ येऊन ठेपला आहे.

भाजपचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांची पदयात्रा खम्मम मतदारसंघात प्रवेश करणार होती. श्रीनिवास रेड्डी यांना भाजप पक्ष प्रवेशासाठी जाहीर सभाही घेण्यात येणार होती. मात्र काही कारणास्तव प्रवेश झाला नाही.

बीआरएसमध्ये आपल्याला स्थान असले तरी लोकांचा आपल्याला प्रचंड समर्थन आहे, असे रेड्डी म्हणाले होते. यानंतर त्यांच्या सुरक्षेत घट करण्यात येत आहे. यानंतर त्यांनी पुन्हा पुढच्या विधानसभेला 'कुरुक्षेत्र' मतदारसंघातून लढू आणि संपूर्ण खम्मम जिल्ह्यात लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू असे ते म्हणाले होते.

Ponguleti Srinivas Reddy BRS
Ukraine Russia War : रशियाच्या 'रडार'वर आता युक्रेनचं 'बखमुत' शहर : झेलेन्स्की म्हणाले, 'जनजीवन उद्धस्थ...'

2014 च्या लोकसभा निवडणुकीत खम्मम मतदारसंघामधून श्रीनिवास रेड्डी हे तेलंगण राष्ट्र समितीचे राज्यातील एकमेव खासदार राहिले होते. त्यांनी टीआरएस पक्षाचं प्रदेशाध्यक्ष या महत्त्लाच्या पदावरही काम पाहिले आहे. दिवंगत मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या परिवाराशी त्यांचे निकटचे संबंध असल्यामुळे ते वायएसआरटीपी या पक्षातही प्रवेश करू शकतात, असेही शकतात असेही अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र असे असले तरी त्यांनी 2018 च्या विधानसभा आणि 2019 च्या लोकसभेला टीआरएस उमेदवारांना समर्थन दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com