Pune court Rahul Gandhi case Sarkarnama
देश

Rahul Gandhi: पुण्यातील एका वकिलामुळे राहुल गांधी पडले तोंडघशी! विरोधकांना मिळाले आयते कोलित; कोर्टात काय घडलं?

Advocate Milind Pawar withdraws plea in Veer Savarkar defamation case: 'राहुल गांधींच्या जीवाला धोका'असा दावा करणाऱ्या त्यांच्या वकिलाने 24 तासांमध्ये घुमजाव केले आहे. पुण्याच्या कोर्टातील याचिका मागे घेतली आहे.काय आहे कारण...

Mangesh Mahale

थोडक्यात

  1. राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी त्यांच्या संमतीशिवाय पुणे न्यायालयात " राहुल गांधी यांच्या जीवाला धोका" असा दावा दाखल केला, मात्र काही तासांतच अर्ज मागे घ्यावा लागला.

  2. काँग्रेसने स्पष्ट केले की हा अर्ज राहुल गांधी यांच्या परवानगीशिवाय दाखल करण्यात आला होता. आता विरोधकांना टीकेची संधी मिळाली आहे.

  3. राहुल गांधींवर सात्यकी सावरकर यांनी मानहानीचा दावा दाखल केला असून, हा वाद काँग्रेससाठी संवेदनशील ठरत आहे.

Pune, 15 Aug 2025: लोकसभा निवडणुकीत मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्याने आपल्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असे लेखी निवेदन काँग्रेस नेते,विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलाने पुण्यातील विशेष न्यायालयात सादर केले होते. पण याबाबत खुद्द राहुल गांधी यांना त्यांचे वकील मिलिंद पवारांनी माहिती दिली नव्हती. बुधवारी (ता.13)याबाबत न्यायालयात मिलिंद पवार यांनी अर्ज केला होता. पण काही तासातच दिल्लीतून चक्र फिरली अन् हा अर्ज मागे घेण्यात आला.

राहुल गांधी यांचे पुण्यातील वकील मिलिंद पवार यांच्यामुळे राहुल यांच्यावरच तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. हाच मुद्दा येणाऱ्या काळात विरोधकांसाठी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास पुरेसा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल गांधी किंवा त्यांच्या दिल्लीतील वकिलांशी चर्चा न करता परस्पर पुणे कोर्टात दाखल केलेला हा अर्ज मागे घेण्याची नामुष्की राहुल यांच्या वकिलांवर आली.

बुधवारी रात्री उशिरा एका प्रसिद्धी पत्रकात, मिलिंद पवार यांनी सांगितले की, त्यांनी गांधी यांच्याशी सल्लामसलत न करता हा अर्ज तयार केला होता आणि गांधींनी "हा अर्ज दाखल करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि त्यात दिलेल्या तथ्यांशी असहमती दर्शवली आहे." काँग्रेसच्या या भूमिकेचा वापर विरोधी गटात राजकीय शस्त्र म्हणून केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशभरात राहुल गांधी यांच्याविरोधात विविध ठिकाणी मानहानीचे दहा दावे दाखल आहेत. त्यातील काही दाव्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. पण पुण्यातील दावा अजून सुरू आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याला राहुल गांधी स्पष्टीकरणाला वकिलांच्यामार्फेत युक्तिवाद करीत आहेत.

राहुल यांची या खटल्यातून निदोष सुटका व्हावी, यासाठी त्यांच्या वकिलांनी प्रयत्न करणे गरजेचे असताना एखाद्या देशपातळीवरच्या राजकीय नेत्याला न सांगताच त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा कोर्टात दाखल करणे, त्यानंतर तो मागे घेणे, हा सर्व प्रकार काँग्रेस विरोधकांना हास्यास्पद वाटल्याशिवाय राहणार नाही, हे यातून स्पष्ट होते.

राहुल यांच्याबाबत त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयात दाखल केलेली कारणे राहुल यांच्याबाबतीत वाद निर्माण करणारी ठरतील, हे काँग्रेसला लवकर लक्षात आले. त्यामुळे पुण्यातील हा दावा काँग्रेसने मागे घेतल्याचे स्पष्टपणे जाणवते.

पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनाते यांनी स्पष्टपणे सांगितले, की हे विधान राहुल यांच्या संमतीशिवाय न्यायालयात सादर करण्यात आले. श्रीनाते यांच्या म्हणण्यानुसार, राहुल यांच्या वकिलाने त्यांच्याशी बोलल्याशिवाय किंवा त्यांची परवानगी न घेता न्यायालयात हे लेखी निवेदन दाखल केले होते. त्यात त्यांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.

राहुल गांधींविरोधात सात्यकी सावरकर यांची काय आहे तक्रार

मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या एका भाषणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दावा केला की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामुळे त्यांना (सावरकर) आनंद झाला. सात्यकी यांनी म्हटले आहे की, अशी कोणतीही घटना कधीच घडली नाही आणि विनायक दामोदर सावरकर यांनी कधीही, कुठेही असे काहीही लिहिलेले नाही.

FAQs

Q1. राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा अर्ज कोणी दाखल केला होता?
A1. त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी संमतीशिवाय अर्ज दाखल केला होता.

Q2. काँग्रेसची या प्रकरणावर भूमिका काय आहे?
A2. काँग्रेसने सांगितले की हा अर्ज राहुल गांधी यांच्या संमतीशिवाय दाखल झाला होता.

Q3. सात्यकी सावरकर यांनी कोणता मानहानीचा दावा दाखल केला आहे?
A3. राहुल गांधींनी सावरकरांविषयी लंडनमधील भाषणात केलेल्या विधानावर मानहानीचा दावा दाखल केला आहे.

Q4. राहुल गांधींविरोधातील किती मानहानीचे दावे प्रलंबित आहेत?
A4. देशभरात दहा मानहानीचे दावे असून, काहींमध्ये त्यांची निर्दोष सुटका झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT