Donald Trump Nobel Prize Sarkarnama
देश

Donald Trump Nobel Prize : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांना शांतेतेचा नोबेल पुरस्कार मिळाला! व्हाईट हाऊसमध्ये काय घडलं?

Donald Trump Nobel Prize Maria Corina Machado: पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या भेटीत माचाडो यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार प्रदान केला.

Mangesh Mahale

शांतेतेचा नोबेल पुरस्कार अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला आहे. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मारिया कोरिना मचाडो यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार दिल्याचे वृत्त आहे.

व्हेनेझुएला संकटात असताना देशाच्या विरोधी पक्षनेत्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना माचाडो आणि डोनाल्ड ट्रम्प यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीत मारिया कोरिना मचाडो यांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार सुपुर्त केल्याचे बोलले जाते.

ट्रम्प यांनी हे पदक स्वीकारले की नाही हे त्यांनी स्पष्ट केले नाही. नियमांनुसार, पुरस्कार हस्तांतरित किंवा सामायिक केला जाऊ शकत नाही, असे नोबेल शांतता पुरस्कार देणाऱ्या संस्थेने आधीच स्पष्ट केले आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेने व्हेनेझुएलाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केली. तेव्हापासून व्हेनेझुएलाच्या राजकीय भविष्यावर तीव्र वादविवाद सुरू झाले होते. गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये मारिया मचाडो दुपारच्या जेवणाच्या बैठकीसाठी पोहोचल्या.

ट्रम्प यांना पुरस्कार दिला की नाही याबाबत मचाडो यांनी माध्यमांनी प्रश्न विचारला होता. पण त्यांनी उत्तर देणे टाळले. एक 'प्रतीकात्मक आणि भावनिक क्षण आहे, असे सांगत त्यांनी यावर फारसे बोलणे टाळले.

आतापर्यंत आठ युद्धे थांबवल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ज्यामध्ये भारत-पाकिस्तान संघर्षाचाही समावेश आहे. त्या बदल्यात ट्रम्प यांनी वारंवार नोबेल शांतता पुरस्काराची मागणी केली आहे.

ट्रम्प यांना पाकिस्तानसारख्या देशांकडून यासाठी पाठिंबाही मिळाला आहे. पण त्यांना यात यश आलेले नाही. मारिया कोरिना मचाडो यांना व्हेनेझुएलातील हुकूमशाहीविरुद्धच्या अटळ लढ्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT