Akjilesh Yadav, Jaya Bacchan, Mulayam Singh Yadav Sarkarnama
देश

Jaya Bachchan News : जया बच्चन यांचा राजकीय ‘सिलसिला’ सुपरहिट; यादवांच्या राजकारणाची ही आहे Inside Story

Rajanand More

Uttar Pradesh News : आमदारांची नाराजी ओढवून घेत समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी जया बच्चन (Jaya Bachchan) यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. त्या सर्वाधिक मतांनी निवडूनही आल्या आहेत. ही त्यांची पाचवी टर्म असणार आहे. समाजवादीच्या ‘पीडीए’ म्हणजे मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक या राजकीय फॉर्म्यूल्याच्या विपरीत बच्चन यांची उमेदवारी असल्याचा आरोप काही आमदारांनी केला. पण त्यानंतर यादवांनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणत त्यांचा राजकीय ‘सिलसिला’ही सुपरहिट ठरवला आहे.

बॉलीवूड (Bollywood) गाजवलेल्या जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी राजकारणातही आपला करिष्मा दाखवून दिला आहे. 2004 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेची (Rajya Sabha) पायरी चढलेल्या जया बच्चन सलग पाचव्या टर्ममध्ये राज्यसभेत पाऊल ठेवणार आहेत. माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास अखिलेश यांनीही कायम ठेवला आहे. जया बच्चन यांच्यासाठी समाजवादी पार्टी (Samajwadi Party) एवढी आग्रही काय आहे, यामागे काही महत्वाची कारणे दडली आहेत.

यादव कुटुंबाशी जवळीक

मुलायम सिंह यांच्यापासून अखिलेश (Akhilesh Yadav) यांच्याशीही बच्चन कुटुंबीयांची जवळीक आहे. मुलायम सिंह यांनी जया बच्चन यांचा चार वेळा राज्यसभेत पाठवले. अमर सिंह समाजवादी पक्षात असताना वाढलेली ही जवळीक ते बाहेर पडल्यानंतरही कायम राहिली. जया बच्चन यांनी पक्ष सोडला नाही.   

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षात ढवळाढवळ नाही

जया बच्चन यांच्याकडून कधीही पक्षातील अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. पक्षीय संघटना, निवडणुकीतील तिकीट वाटप किंवा इतर गोष्टींपासून त्या चार हात लांबच राहतात. राज्यसभेच्या खासदार म्हणून करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठाही त्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला घेतात.

सेलिब्रिटी म्हणून फायदा

जया बच्चन या सेलिब्रिटी असल्याने त्याचा फायदा पक्षाला होत असल्याचे मानले जाते. प्रचारसभांमध्ये त्यांनाही उतरवले जाते. तसेच त्यांच्याकडे कला, सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणूनही पाहिले जाते. संसदेतही त्यांच्याकडून याविषयी विविध मुद्दांवर प्रश्न उपस्थित केले जातात.

महिला चेहरा

समाजवादी पक्षाचा महिला चेहरा म्हणूनही समाजवादी पार्टीला नेहमीच जया बच्चन यांची मदत झाली आहे. विशेष म्हणजे अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याकडूनच त्यांना अधिक पसंती दिली जाते. डिंपल यादवही राज्यसभेत आहेत.

पक्षातील ज्येष्ठ नेते पाठिशी

मुलायम सिंह यादव यांच्या काळापासून पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी जया बच्चन यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनीही नेहमीच त्यांचे समर्थन केले आहे. रामगोपाल यादव यांचीही राज्यसभेची पाचवी टर्म सुरू आहे.

संसदेत सक्रीय

राज्यसभेत जया बच्चन यांच्याकडून सातत्याने विविध चर्चांमध्ये सहभाग घेतला जातो. त्यांनी संसदेतील उपस्थितीही लक्षणीय आहे. समाजवादी पार्टीच्या धोरणानुसार, त्या सरकारविरोधात जोरकसपणे भूमिका मांडताना दिसता. अनेकदा त्यांचा संताप अनावर झाल्याचेही पाहायला मिळते. त्या आपल्या विचारांवर ठाम राहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT