Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारवरील संकटाचे ढग अद्याप ओसरलेले नसले तरी तात्पुरता दिलासा मिळाला आहे. विधानसभेत आज अर्थसंकल्प मंजूर करण्यात सरकारला यश मिळाले आहे. तर दुसरीकडे राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या सहा आमदारांनाही अपात्रतेची (Congress MLAs Disqualification Case ) नोटीस बजावण्यात आली आहे.
कॉस वोटिंगमुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली. त्यानंतर राज्यातील सरकारही कोसळणार असा दावा भाजपकडून करण्यात आला. त्यानुसार भाजपने (BJP) आज विधानसभेत बहुमत चाचणीची मागणी केली. पण विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे 15 आमदार निलंबित केले. त्यानंतर इतर आमदारांनीही कामकाजवर बहिष्कार टाकला. या गोंधळातच सरकारकडून अर्थसंकल्प (Budget 2024) मंजूर करण्यात आला.
बहुमत नसलयाने अर्थसंकल्प मंजूर होणार नाही, असे भाजपकडून सांगितले जात होते. पण भाजपच्या आमदारांना निलंबित करण्याची खेळी यशस्वी करत काँग्रेसने सरकारवरील (Congress Government) संकटाचे ढग काही प्रमाणात दूर सारले. त्यानंतर क्रॉस वोटिंग करणाऱ्या त्या सहा आमदारांनाही अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. याचा निकाल विधानसभा अध्यक्ष देणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सहा आमदारांकडून नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी मागितला जाणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. मात्र, विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) काय निर्णय घेणार, यावर या आमदारांचे भवितव्य अवलंबून असेल. दरम्यान, हे सहा आमदार अपात्र ठरल्यास पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होईल. त्यामुळे बहुमताचा आकडा 35 वरून खाली येईल. सध्यातरी काँग्रेसकडे तेवढे संख्याबळ असल्याचा दावा केला जात आहे.
राजीनामा देणार नाही
अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (CM Sukhvinder Singh Sukhu) यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करेल. भाजपकडून आपल्या राजीनाम्याच्या बातम्या पेरल्या जात असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. क्रॉस वोटिंग केलेले काही आमदारही आपल्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.