Rahul Bajaj
Rahul Bajaj  Sarkarnama
देश

'हमारा बजाज' म्हणत राहुल बजाज यांनी अनेक सर्वसामान्यांचे वाहनाचे स्वप्न पुर्ण केले होते...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : 'हमारा बजाज' म्हणत सर्वसामान्यांचे वाहनाचे स्वप्न पुर्ण करणाऱ्या देशातील अग्रगण्य उद्योजक राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी निधन झाले. (Rahul Bajaj Passes away) ते ८३ वर्षांचे होते. गेल्या ५ दशकांमध्ये बजाज उद्योग समूहाला (Bajaj Group) नावारूपाला आणण्यात आणि 'बजाज ऑटो'ला दुचाकी- तीन चाकी वाहन क्षेत्रात सर्वोच्च कंपनी बनवण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले (राजीव आणि संजीव) आणि एक मुलगी (सुनैना केजरीवाल) असा परिवार आहे.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ रोजी कोलकता येथे झाला होता. त्यांनी अर्थशास्त्र आणि विधीमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण आणि हॉवर्ड विद्यापीठातून 'एमबीए'चे शिक्षण घेतले होते. शिक्षणानंतर ते १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात उभं करण्यात त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. १९६५ मध्ये ३ कोटींच्या उलाढालीवरून सन २००८ मध्ये बजाजने सुमारे १० हजार कोटींची उलाढाल गाठली. (Rahul Bajaj Passes away)

गतवर्षीच राहुल बजाज यांनी कंपनीच्या संचालक आणि अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर त्यांचे चुलत भाऊ नीरज बजाज यांच्याकडे 'बजाज'ची सर्व सुत्र सोपविण्यात आली होती. राहुल बजाज १९६८ मध्ये बजाज ऑटोचे सुत्र स्विकारली होती. यानंतर राहुल यांनी स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष त्यांच्या याच प्रयत्नांमुळे २००१ साली राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते राज्यसभेवर खासदार देखील होते. (Rahul Bajaj Passes away)

मात्र या संपुर्ण राहुल बजाज यांनी 'हमारा बजाज' अशा प्रसिद्ध टॅगलाईनच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्यांसाठीचे स्वतःच्या दुचाकीचे स्वप्न पुर्ण केले. तर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्यांनी तीन चाकीचे ही स्वप्न पुर्ण केले. बजाज समूहाकडे बजाज ऑटोशिवाय बजाज फिन सर्व्हिसेस, बजाज फायनान्स अशा नामांकित कंपन्या आहेत. बजाज अॅटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आहेत, तर बजाज फिन सर्व्हिसेसचे संजीव बजाज अशी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी सुनयना हिचा विवाह मनीष केजरीवाल यांच्याशी झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT