प्रशांत किशोर यांच्या कंपनीवर गोवा पोलिसांचे छापे : कर्मचारी अटकेत

Goa Police raid on prashant kishor i-pac company : मतदानाच्या तोंडावर तणाव वाढला...
Prashant Kishor Statement on 2024 Election
Prashant Kishor Statement on 2024 ElectionSarkarnama
Published on
Updated on

पणजी : निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या I-PAC कंपनीवर गोवा पोलिसांनी (Goa Police) छापे टाकले आहेत. कारवाई दरम्यान पोलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून गांजा जप्त केला असून संबंधित कर्मचाऱ्याला पर्वरी शहरातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे वय २८ आहे. पोलिसांनी त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोवा पोलिसांनी शुक्रवारी पर्वरीमधील अनेक बंगल्यांवर छापे टाकले. या ठिकाणी I-PAC कंपनीने ८ बंगले भाड्याने घेतले आहेत.

गेल्या अडीच वर्षांपासून तृणमूल कॉंग्रेससाठी (TMC) काम करणारे प्रशांत किशोर गोव्यात पक्षाचे निवडणुकीसाठी काम सांभाळत आहेत. गोव्यात १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. मात्र त्यापुर्वीच त्यांच्या कंपनीवर छापा पडला असून त्यात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी यांच्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

Prashant Kishor Statement on 2024 Election
बंगालमध्ये तणाव टोकाला : राज्यपालांनी ममतांच्या परस्पर गुंडाळलं विधानसभेचे अधिवेशन

प्रशांत किशोर यांची I-PAC कंपनी निवडणूक व्यवस्थापनाचे काम करते. यापूर्वी २०१४ साली भाजपसाठी काम केल्यानंतर प्रशांत किशोर पहिल्यांदा चर्चेत आले होते. त्यानंतरच्या काळात भाजपपासून लांब जात त्यांनी जनता दल (संयुक्त) पक्षातून प्रत्यक्ष राजकारणात एन्ट्री घेतली होती. पुढे जनता दल (संयुक्त) आणि नितीशकुमारांचा हात सोडून त्यांनी राजकारणाला रामराम केला होता.

Prashant Kishor Statement on 2024 Election
सोमय्या, बापट २ तास पोलिस ठाण्यात बसले... पण गुन्हा दाखल नाही झाला

मात्र पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी तृणमूल काँग्रेसचा हात धरला होता. ते मागच्या तब्बल २.५ वर्षांपासून ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेससाठी काम करत आहेत. पण मागच्या काही दिवसांपूर्वीपासून प्रशांत किशोर आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील संबंध बिघडले असल्याच्याही बातम्या येत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपावरून गोंधळ झाला आहे. या पार्श्वभूमीवर करार संपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या चर्चा समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com