Jagdeep Dhankhar Sarkarnama
देश

Vice President Election : उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीला अवघे काही तास उरले असतानाच जगदीप धनखड यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली मोठी मागणी

Vice President Election 2025 : उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुसाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली असून या दोन उमेदवारांमध्ये आज प्रमुख लढत होणार आहे.

Jagdish Patil

Jagdeep Dhankhar Letter : देशाचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपराष्ट्रपति‍पदासाठी आज मंगळवारी (ता.09) निवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठी एनडीएकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली असून या दोन उमेदवारांमध्ये आज प्रमुख लढत होणार आहे.

अशातच आता उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीच्या मतदानापूर्वीच माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहित एक मोठी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राजधानी नवी दिल्ली येथे एक बंगला द्यावा, अशी मागणी करणारं पत्र त्यांनी केंद्र सरकारला लिहिलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

धनखड यांनी आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाला हे पत्र लिहिलं असून त्यामध्ये सरकारी निवासस्थान उपलब्ध करुन देण्याची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. जगदीप धनखड हे मागील आठवड्यात वीपी एनक्लेवमधून दक्षिण दिल्लीतील ठतरपूर येथील भारतीय लोकदलाचे नेते अभय चौटाला यांच्या खासगी फार्म हाऊसमध्ये शिफ्ट झाले होते.

दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आवास आणि शहरी कार्य मंत्रालयाने अद्याप धनखड यांना कोणताही बंगला दिलेला नाही. त्यामुळे धनकड यांनी पत्र लिहित बंगला देण्याची मागणी केल्याची माहिती आता समोर आली आहे.

तर जगदीप धनकड यांच्यासाठी लुटियन्स दिल्ली येथील एपीजे अब्दुल कलाम मार्गावरील 34 नंबरचा टाइप-आठचा बंगला तयार असून तो त्यांना देण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT