Vice President Election 2025 : देशाला आता लवकरच १५ वे उपराष्ट्रपती मिळणार आहेत. कारण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ९ सप्टेंबर रोजी नव्या उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. तर इंडिया आघाडीनं सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवलं आहे. त्यातच आता रेड्डी यांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी झटका बसला आहे. कारण विरोधी पक्षातील दोन पक्षांनी त्यांना मतदान करणार नसल्याचं जाहीर केलं आहे.
भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस आणि बिजू जनता दल अर्थात बीजेडी या दोन पक्षांनी उद्या होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के टी रामा राव यांनी म्हटलं की, त्यांचा पक्ष उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहणार आहे. याचप्रकारे बीजेडीचे नेते खासदार सस्मित पात्रा यांनी सांगितलं की, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी निर्णय घेतला आहे की, पक्षाचे खासदार उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानापासून दूर राहतील. त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते, राजकीय प्रकरणातील समितीच्या सदस्यांशी तसंच खासदारांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय़ घेतला आहे. पात्रा यांनी सांगितलं की, आमचं संपूर्ण लक्ष ओडीशा आणि इथल्या ४.५ कोटी लोकांच्या विकासावर आहे.
तर दुसरीकडं बीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष केटी रामाराव यांनी सोमवारी सांगितलं की, त्यांचा पक्ष उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहणार आहे. तेलंगाणाच्या शेतकऱ्यांमध्ये युरियाच्या तुटवड्यामुळं काँग्रेस आणि भाजप या दोघांवर आरोप लावताना रामाराव म्हणाले, काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष हा मुद्दा सोडवण्यात फेल राहिले आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की, युरियाचा इतका तुटवडा आहे की, रांगांमध्ये उभं राहून शेतकऱ्यांमध्ये हाणामारी होत आहे. त्यामुळं आम्ही मतदानापासून दार राहणार आहोत. जर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत नोटाचा पर्याय असता तर आम्ही तो पर्याय वापरला असता.
बीजेडी आणि बीआरएस या दोन पक्षांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय जाहीर केला. पण अद्याप अकाली दल, जेडपीएम आणि व्हीओटीटीपी या पक्षांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही. या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी एक खासदार आहेत. तसंच तीन अपक्ष खासदारांनी देखील आपला निर्णय जाहीर केलेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.