Tamil Nadu News: तामिळनाडूत गेल्या मे महिन्यांत सत्तांतर झाले आहेत.विजय यांच्या टीव्हीके पक्षानं अभूतपूर्व यश मिळवत सत्ता स्थापन केली. यानंतर मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वातील सरकारने आतापर्यंत एकापाठोपाठ एक असे धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. अशातच आता विजय यांनी डीएमकेला पहिला मोठा दणका दिला आहे.
तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये 2021 ते 2026 या काळात अनबिल महेश पोय्यामोळी यांनी शालेय शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, त्यांना खासगी शाळांना परवाने आणि इतर सरकारी मंजुरी मिळवून देण्या प्रकरणी कथित 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चेन्नई पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेने (CCB) अटक केली आहे.
द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या अनबिल महेश यांनी खासगी शैक्षणिक संस्थांना सरकारी मंजुरी मिळवून देण्याचं आश्वासन देत त्यांच्याकडून पैसे मागितल्याच्या गंभीर आरोपांची चौकशी सुरू होती.
चेन्नई पोलिसांच्या केंद्रीय गुन्हे शाखेला तपासादरम्यान मिळालेले पुरावे, डिजिटल उपकरणांमधून मिळालेली माहिती आणि चौकशीदरम्यान नोंदवलेले जबाब यांमधून याप्रकरणी अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचं समोर आलं होतं.
या प्रकरणी तामिळनाडूतील खासगी शाळांच्या संघटनांच्या महासंघाचे सचिव इलंगोवन यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आता मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी महेश यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज फेटाळल्यानंतर ही अटक करण्यात आली. अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी माजी मंत्र्यांनी केलेली विनंती न्यायमूर्ती व्ही.लक्ष्मीनारायण यांनी नामंजूर केली. याचदरम्यान,महेश यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला प्रथम माहिती अहवाल (FIR) रद्द करण्यासाठीही न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.
तसेच तपासादरम्यान,माजी शालेय शिक्षणमंत्री अनबिल महेश यांच्यासंबंधी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरण कनेक्शनसंबंधी महत्त्वाचे पुरावेही मिळाल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या कथित गैरव्यवहारात सुमारे 177 शाळांचा सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. त्यानंतर पोलिसांनी माजी मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील कलमान्वये कारवाई केली आहे.
माजी मंत्री महेश यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून,या प्रकरणातील कारवाईलाही आव्हान दिले आहे. दरम्यान,सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (TVK) सरकार तपास यंत्रणांचा वापर करून विरोधी बाकावरील राजकीय पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप डीएमकेकडून करण्यात केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.