Tamil Nadu Assembly Election 2026 Vijay Thalapathy Gives MLA Ticket to Driver’s Son Sarkarnama
देश

Vijay Thalapathy News: विजयनं आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला दिलं आमदारकीचं तिकीट!! बाप-लेक भावूक; व्हिडिओ पाहा

Tamil Nadu Assembly Election 2026 Vijay Thalapathy Gives MLA Ticket to Driver’s Son: सबरिनाथन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राजेंद्रन आणि सबरिनाथन हे व्यासपीठावर आले. सबरिनाथन यांनी विजय यांनी खाली वाकून नमस्कार केला. त्यांची गळाभेट घेतली.

Mangesh Mahale

Tamil Nadu Election 2026: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी टीवीकेचे (Tamilaga Vettri Kazhagam) चे प्रमुख विजय थलापती यांनी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.

त्यांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावामध्ये एक नाव त्यांच्या ड्रायव्हरच्या मुलाचेही आहे. विजय यांनीनाव जाहीर करताच ड्रायव्हर आणि त्यांचा मुलगा व्यासपीठावर आले, त्यावेळी बाप-लेक भावूक झाले. खुद्द विजय यांनी त्यांचे अश्रू पुसले!

प्रसिद्ध अभिनेता आणि तमिलगा वैत्री कझगम (टीव्हीके) या राजकीय पक्षाचा प्रमुख विजय याने सध्या आपले पीए असलेले राजेंद्रन यांच्या मुलगा सबरिनाथन यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. राजेंद्रन हे यापूर्वी विजय याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करीत होते.

सबरिनाथन यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर राजेंद्रन आणि सबरिनाथन हे व्यासपीठावर आले. सबरिनाथन यांनी विजय यांनी खाली वाकून नमस्कार केला, त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर त्यांना रडू कोसळले. विजय यांनी त्यांचे अश्रू पुसले. यावेळी राजेंद्रन हेही भावूक झाले होते.

राजेंद्रन हे विजयचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेली अनेक वर्ष विजयच्या कारचे ते चालक होते. त्यांची निष्ठा आणि विश्वास लक्षात घेता विजयने सध्या त्यांची पर्सनल असिस्टेंट म्हणून नियुक्ती केली आहे. विजय यांनी जेव्हा राजकारणात एन्ट्री केली त्यावेळी सबरिनाथन यांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. आता ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

खुद्द विजय दोन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. चेन्नईच्या पेरम्बूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व येथून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विजयच्या राजकारणातील प्रवेशाने तमिळनाडूतील राजकीय गणितं बिघडणार आहेत.

सामान्य जनतेच्या पाठीशी जो उभा राहील अशाच व्यक्तींना आमदारकीचं तिकीट दिले आहे, असे सांगत युवकांच्या विकासाची भरोसा विजयने यावेळी उपस्थितांना दिला. तामिळनाडूला व्यसनमुक्त करणे, बारावी ते पीएचडीपर्यंत 20 लाखांचे विना अट कर्ज देण्याची घोषणा विजयने आपल्या जाहीरनाम्यात दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT