Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणाचं गूढ वाढलं! मोबाईल डेटामधून धक्कादायक माहिती; 'त्या' खास व्यक्ती कोण?

Ashok Kharat Case Mobile Data Reveals News: अशोक खरात प्रकरणात नवा खुलासा! मोबाईल डेटामधून खास व्यक्तींची नावे डमी स्वरूपात सेव्ह असल्याचे उघड.
police investigation in Ashok Kharat case
police investigation in Ashok Kharat caseSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Case News update: महिलांवरील अत्याचार प्रकरणात सध्या एसआयटीच्या ताब्यात असलेला भोंदू अशोक खरात प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. अटकेच्या वेळी अशोक खरातचा लॅपटॉप, मोबाइलसह विविध कागदपत्रेही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या मोबाईलमधील डाटा तपासणीचे काम एसआयटीचे पथक करीत आहेत. या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे.

या प्रकरणाची व्याप्ती वाढत आहे. सध्या तपास प्राथमिक अस्वस्थेत आहे. खरात आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयीतांची कसून चौकशी पोलिस करीत आहेत. त्याचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. डिजिटल पुरावे, आणि इतर पीडित महिलांची माहिती घेतली जात आहे. खरातच्या मोबईलमध्ये त्याने अडीच हजारांहून अधिक नंबर कोडवर्डमध्ये सेव्ह केले असल्याचे तपासात आढळले आहे.

खरातकडे एक नव्हे तर दोन मोबाइल होते. ते जप्त करण्यात आले आहे. पोलिस त्यातील डेटा रिकव्हर करीत आहेत. मोबाइलमध्ये काही खास व्यक्तींची नावे 'डमी' स्वरूपात सेव्ह करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. अशोक खरातने पीडित महिलांचे नंबरही सेव्ह केलेले नाहीय. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.

police investigation in Ashok Kharat case
IAS Deputation News: IAS अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती: सरकारला मोठा दणका, शिक्षण विभागातील नियुक्तींवर प्रश्नचिन्ह

तपासात अद्याप अनेक गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. अशोक खरातच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. आता 1 एप्रिलपर्यंत खरात पोलिसांच्या ताब्यात राहणार आहे. खरातकडून फसवणूक झालेल्या महिला समोर येत आहेत. खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करीत आहेत. पीडित महिलांचे नंबरही अशोक खरातने सेव्ह केलेले नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तो वेगळ्या मोबाइलचा वापर करत होता, अशी माहितीही समोर आली आहे.

police investigation in Ashok Kharat case
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात ED ची एन्ट्री? हवाला रॅकेटचे SIT च्या हाती लागले सबळ पुरावे; भ्रष्ट अधिकाऱ्यांनीच पुरवली रसद

आता नाशिकच्या बांधकाम व्यवसायापर्यंत खरात प्रकरणातील धागेदोरे पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. खरातचे 'आशीर्वाद' असलेल्या या महिला भक्ताने बांधकाम व्यवसायात जम बसवल्याची माहिती समोर येत आहे.

खरातची पुण्यातील एक महिला भक्त असून तिची राजकीय वर्तुळात उठबस असल्याची माहिती समोर आली आहे. अशोक खरातची ही कट्टर समर्थक समजली जाते. तिचे नाशिकमधील अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांशी व्यावसायिक हितसंबंध असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे.

police investigation in Ashok Kharat case
Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार का? पोलिस आयुक्त काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com