Vinay Kumar Saxena sarkarnama
देश

आप नेत्यांच्या अडचणीत वाढ; उपराज्यपाल सक्सेना करणार कायदेशीर कारवाई

आप (AAP) नेत्यांनी सक्सेना यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते

सरकारनामा ब्यूरो

Vinay Kumar Saxena : नवी दिल्ली : दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना (Vinay Kumar Saxena) आम आदमी (AAP) पक्षाच्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई करणार आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आतिशी, सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि जास्मिन शाह यांनी उपराज्यपालांवर आरोप करत १४०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे म्हटले होते. त्यावर या नेत्यांनी केलेले आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचे सांगत सक्सेना यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

सोमवारी आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांनी दिल्ली विधानसभेत आरोप केला होता की, उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी 2016 मध्ये खादी विकास आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष असताना आपल्या कर्मचाऱ्यांना 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देण्यास भाग पाडले होते. "जेव्हा ते KVIC चे चेअरमन होते, तेव्हा नोटाबंदी झाली होती. तिथे काम करणाऱ्या एका कॅशियरने त्यांना नोटा बदलून देण्यास भाग पाडल्याचे लेखी दिले होते. त्याला निलंबित करण्यात आले हे दुर्दैव आहे. मात्र, त्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केला होती.

जेव्हा सक्सेना केव्हीआयसीचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या कॅशियरवर दबाव आणून जुन्या नोटा बदलून घेतल्या. एकट्या दिल्ली शाखेत 22 लाख रुपयांची देवाणघेवाण झाली. देशभरात अशा 7000 शाखा आहेत, म्हणजे 1400 कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता, असा आरोप आपने केला होता.

त्यावर उपराज्यपाल कार्यालयाने खुलास केला आहे. ते म्हणाले, दोन लोकांच्या वक्तव्याच्या आधारे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी हा आरोप केला आहे, की सीबीआयच्या तपासात खादी ग्रामोद्योग आयोगाच्या प्रथमदर्शनी भ्रष्टाचारात सक्सेना दोषी आढळले आहेत. आप नेत्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. सीबीआयच्या तपासात असे आढळून आले आहे की हे प्रकरण २२ लाख रुपयाचे नसून 500 आणि 1000 च्या नोटांच्या स्वरूपात फक्त 17.07 लाख रुपये जमा केल्याचे आहे. उपराज्यपाल कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, हे प्रकरण 17 लाख 7 हजार रुपयांचे होते, तर आप नेत्यांनी ते 1400 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले आहे.

या प्रकरणी सीबीआयने संजीव कुमार मलिक आणि प्रदीप यादव या दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून हे प्रकरण न्यायालयात आहे. सक्सेना यांच्या कायदेशीर कारवाईच्या धमकीवर आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज म्हणाले की, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी. हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आले ते नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. आप आमदारांनी या प्रकरणाची सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) मार्फत चौकशी करण्याची आणि उपराज्यपाल सक्सेना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनी विधानसभा संकुलातील गांधी पुतळ्याजवळ सक्सेना यांच्या विरोधात घोषणा बाजी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT