Vinod Tawade : भाजपाने गुजरात विधानसभा निवडणुकीत एेतिहासिक विजय मिळवला तर हिमाचल प्रदेशमध्ये सत्ता राखण्यात त्यांना अपयश आले. तिथे पाच वर्षांनंतर काँग्रेस सत्तेत परतले आहे. पण अंतिम निकालाआधी आणि काँग्रेसच्या विजयाचा अंदाज आल्यावर भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात करण्यात आली होती.
यावेळी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी हिमाचलमधील 'ऑपरेशन लोटस'ची जबाबदारी महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांवर सोपवली. यात देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे (Vinod Tawade) यांचा सहभाग होता. यापैकी तावडे हे तयारीनिशी हिमाचल प्रदेशला गेले देखील होते. मात्र, आकड्यांचा खेळ न जमल्यामुळे अखेर भाजपला माघार घ्यावी लागली अन् त्यांचं सत्तास्थापनेचं स्वप्न भंगलं.
गुजरातसह हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी लागले. यात गुजरातमध्ये भाजपने विजयाचा गुलाल उधळला तर हिमाचलमध्ये काँग्रेसनं त्यांना धोबीपछाड़ दिला. भाजप-काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली. पण अंतिम निकालात तिथे 68 जागांपैकी काँग्रेसला 40 तर भाजपाला 25 जागा मिळाल्या.त्यामुळे तिथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. पण ज्यावेळी काँग्रेस 30 ते 35 जागांवर आघाडीवर होते. आणि भाजप 25 जागांच्या जवळपास होते. त्यावेळी भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या.
गडकरींप्रमाणे सत्तेचा चमत्कार घडवण्यात तावडेंना अपयश...
गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेच्या अगदी जवळ पोहचली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांचा आळस पक्षाला नडला आाणि त्या ठिकाणी भाजपने सत्ता बनविली होती. चाळीस जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये काँग्रेसला १७ जागा मिळाल्या हेात्या, तर भाजपला १३ जागा मिळाल्या हेात्या. बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता होती, त्यावेळी भाजपकडून नितीन गडकरी यांनी रातोरात गोवा गाठून सत्तेचा सोपान भाजपच्या बाजून झुकविला होता.
त्यावेळी काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी असलेले दिग्विजसिंह हे दिल्लीत सत्ता येण्याची स्वप्न रंगवत होते. मात्र, गडकरींनी बाजू पलटवली हेाती. त्यामुळे गडकरींप्रमाणे तावडे हिमाचलप्रदेशमध्ये बाजी पलटवणार का याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतू तावडेंना गडकरींच्या चमत्काराची पुनरावृत्ती करण्यात अपयश आलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.