PM Narendra Modi : देशातील तरुणांना जातीपाती आणि परिवाराचं राजकारण नको आहे. त्यांना विकासाचं राजकारण हवं आहे. हे निवडणुकीच्या निकालाने स्पष्ट केले आहे. आणि भाजपकडून केवळ विकासाचं राजकारण केल जातं. म्हणून देशातील तरुणांचा भाजपवर विश्वास आहे. जनसमर्थनातून घराणेशाहीवरील आक्रोश दिसतोय. देशहितासाठी मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद फक्त भाजप दाखवते असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी केलं आहे.
गुजरातमधील अभूतपूर्व विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, देशासमोर कोणतंही संकट येतं तेव्हा देशातील जनतेचा विश्वास भाजपवर असतो. देशहितासाठी भाजप मोठे आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद दाखवते. आम्ही घोषणेसाठी घोषणा करत नाही तर राष्ट्र निर्माणासाठी व्यापक मोहीम हाती घेऊन पुढे निघालेलो लोक आहोत.
यावेळी मोदी यांनी गुजरात,दिल्ली,हिमाचल प्रदेशातील जनतेचे आभार मानले. तसेच हिमाचल प्रदेशात भाजप उमेदवार फक्त एक टक्क्याने मागे राहिले. भलेही या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असला तरी तेथील विकासकामांसाठी आम्ही कटिबध्द असणार असून देशात पुढील 25 वर्ष फक्त विकासकामांचेच असणार आहेत असेही स्पष्ट केले.
आजच्या निकालाने एक स्पष्ट संदेश दिला आहे की, जे राजकीय पक्ष राजकीय स्वार्थासाठी जातीपाती, भाषा अशा विविध मुद्द्यांवरुन समाजात दुफळी निर्माण करत आहे. पण तोडण्यासाठी अनेक मुद्दे आहेत माक्ष, एकत्रित येण्यासाठी देशप्रेम हे एक कारण पुरेसं आहेत.दोन समाजात फूट पाडणार्यांना जनता पुढील काळात धडा शिकवेल असं देखील मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी गुजरातने कमाल केली. मी नरेंद्रचा रेकाँर्ड तोडायला हवं असं मी गुजरातच्या जनतेला सांगितलं होतं. आणि गुजरातच्या स्थापनेपासूनचा सर्वात मोठा विजय या निवडणुकीत मिळाला असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.