Kerala legislative assembly election : केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांसह सहा राज्यांतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम रविवारी जाहीर केला. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. पाचही राज्यांमध्ये विजय मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी बड्या नेत्यांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या खांद्यावर केरळमध्ये पहिला विजय मिळविण्याचे आव्हान असणार आहे. काही दिवसांपूर्वी तावडे यांची केरळचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत केरळमध्ये भाजपला एकदाही विधानसभेत बहुमत मिळालेले नाही. केरळमध्ये सध्या भाजपचा एकही आमदार नाही. त्यामुळे तावडे यांना थेट शुन्यापासून सुरूवात करावी लागणार आहे. तावडे यांच्यासाठी हे शिवधनुष्य ठरणार आहे.
केरळमध्ये ९ एप्रिलला मतदान असून ४ मे रोजी मतमोजणी होईल. आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करताच तावडे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत कार्यकर्त्यांना भाजप सत्तेत येईपर्यंत थांबू नका, असे आवाहन केले आहे. तावडे यांनी म्हटले आहे की, उठा, कठोर परिश्रम करा आणि केरळममध्ये भाजप सत्तेत येईपर्यंत थांबू नका.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'विकसित भारत विकसित केरळम' हा संदेश प्रत्येक घरात पोहोचविण्याचे तसेच विकास आणि समावेशक प्रशासनाच्या चळवळीला बळकटी देण्याचे आवाहन तावडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, तावडे यांची नुकतीच महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. अद्याप त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथही घेतलेली नाही.
विनोद तावडे हे यापूर्वी बिहारमध्ये प्रभारी होते. तिथे भाजपने ऐतिहासिक विजय मिळवत पहिल्यांदाच सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे केरळमध्येही तावडे यांना चमत्कार करावा लागणार आहे. शुन्यापासून ते किती जागांपर्यंत उडी घेणार, याबाबतची उत्सुकता लागली आहे. त्यामुळेच त्यांनी निवडणूक जाहीर होताच त्यांनी कार्यकर्त्यांना रात्रंदिवस झोकून देत काम करण्याचे आवाहन केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.