Vinod Tawde-Nitin Gadkari
Vinod Tawde-Nitin Gadkari Sarkarnama
देश

Himachal Pradesh Election: विनोद तावडे नितीन गडकरींप्रमाणे हिमाचलमध्ये बाजी पलटवणार?

विजय दुधाळे

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हिमाचलमध्ये काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ३० जागांवर पुढे आहे. हिमाचलमध्ये ३४ हा बहुमताचा आकडा आहे, त्यामुळे सध्या तरी काँग्रेस सत्तेच्या जवळ जाताना दिसत आहे. मात्र, तीन अपक्ष उमेदवार हे भाजप समर्थक आहेत. त्यामुळे भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून पक्षाचे महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) हिमाचलकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे तावडे हे नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याप्रमाणे चमत्कार घडविणार का, याकडे देशासह महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. (Vinod Tawde will create miracles in Himachal like Nitin Gadkari)

हिमाचल प्रदेशमध्ये सध्या काठावरचे आकडे आहेत. त्यामुळे भाजपसह काँग्रेसकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न होताना दिसत आहे. विशेषतः निकालातील सुरुवातीचे कल पाहून भाजप श्रेष्ठींनी प्रभारी आणि भाजपचे महासचिव विनोद तावडे यांना तातडीने हिमाचल प्रदेशकडे रवाना केले आहे. हिमाचलमध्ये सरकार स्थापनेच्या सर्व शक्यता पडताळण्यासाठी भाजप श्रेष्ठींकडून त्यांना आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, याआधी चंदीगड महापालिकेत बहुमत नसतानही भाजपचा महापौर बनवण्यात विनोद तावडे यांनीची महत्वाची भूमिका निभावली होती. चंदगड महापालिकेत आपचा महापौर बनणार, अशी शक्यता होती. मात्र, तावडे यांनी चंदीगडमध्ये भाजपचा महापौर केला होता, त्यामुळे हिमाचल जबाबदारी असलेले तावडे पुन्हा चमत्कार करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेच्या अगदी जवळ पोचली होती. मात्र, काँग्रेस नेत्यांचा आळस पक्षाला नडला आाणि त्या ठिकाणी भाजपने सत्ता बनविली होती. चाळीस जागा असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २०१७ मध्ये काँग्रेसला १७ जागा मिळाल्या हेात्या, तर भाजपला १३ जागा मिळाल्या हेात्या. बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता होती, त्यावेळी भाजपकडून नितीन गडकरी यांनी रातोरात गोवा गाठून सत्तेचा सोपान भाजपच्या बाजून झुकविला होता. त्यावेळी गोव्याचे प्रभारी असलेले दिग्विजसिंह हे दिल्लीत सत्ता येण्याची स्वप्न रंगवत होते. मात्र, गडकरींनी बाजू पलटवली हेाती. त्यामुळे गडकरींप्रमाणे तावडे हेही हिमाचलप्रदेशमध्ये बाजी पलटवणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT