Jagdeep Dhankhar Sarkarnama
देश

Jagdeep Dhankhar : मंदिरांमधील VIP कल्चरवर उपराष्ट्रपती भडकले; म्हणाले, हे तर संस्कृतीवर अतिक्रमण!

Vice President of India Comment on VIP Darshan at Temple : देशभरातील अनेक मंदिरांमध्ये राजकीय नेते किंवा इतर क्षेत्रातील बड्या व्यक्तींना दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते.  

Rajanand More

New Delhi : मंदिरांमधील व्हीआयपी संस्कृतीचा मुद्दा यापूर्वी अनेकदा चर्चेत आला आहे. आता पुन्हा एकदा थेट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीच यावर भाष्य केल्याने चर्चेला तोंड फुटले आहे. मंदिरांमधील व्हीआयपी कल्चरवर नाराजी व्यक्त करताना ते बंद व्हायला हवे, असे धनखड म्हटले आहे. तसेच हे संस्कृतीवर अतिक्रमण असल्याचे विधानही त्यांनी केले आहे.

धनखड यांच्या हस्ते मंगळवारी कर्नाटकातील श्री मंजूनाथ मंदिरात देशातील सर्वात मोठ्या ‘क्यू कॉम्प्लेक्स’चे उद्घाटन केले. त्यानंतर त्यांनी मंदिरांमधील व्हीआयपी संस्कृतीवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, जेव्हा एखाद्याला प्राथमिकता दिली जाते तेव्हा आपण त्याला व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी म्हणतो. हे समानतेच्या संकल्पनेच्या विरोधात आहे. व्हीआयपी संस्कृती अतिक्रमण आहे. त्यामुळे समाजात त्याचे काहीच स्थान नाही. धार्मिक ठिकाणी तर अजिबातच नाही.

धनखड यांनी यावेळी राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केले. ते म्हणाले, भारतात होत असलेले राजकीय परिवर्तन जलवायू परिवर्तनापेक्षा घातक आहे. भारतीय लोकशाहीविरोधी राजकीय शक्तींकडून त्याचे संचलन होत आहे. विभाजनवादी व चुकीच्या माहितीच्या माध्यमातून आपल्याला कमकुवत करणाऱ्या भारतविरोधी शक्तींनाच कमकुवत करावे लागेल.

उपराष्ट्रपती म्हणाले, भारत अनेक क्षेत्रांमध्ये विकासाच्या दिशेने पुढे जात असताना आपल्याला विभाजनवादी शक्तींच्या विरोधात उभे राहावे लागेल. एकजुट, केंद्रित आणि विकासाभिमुख संकल्प करत त्यांना पराभूत करायला हवे. आपला समाज भौतिकवादाच्या सिध्दांताच्या आधारे बनलेला नाही त्यामुळे मी भारतातील कॉर्पोरेट जगताला आवाहन करतो की, त्यांनी पुढे येत सीएसआरच्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षणात योगदान द्यावे.

धनखड यांनी आधुनिक भारतासाठीच्या पाच सिध्दांताचा उल्लेखही केला. त्याला त्यांनी ‘पंच प्रण’ म्हटले. ते म्हणाले, सामाजिक सद्भाव हे आपले मुख्य मुल्य असायला हवे. त्यामाध्यमातून कौटुंबिक स्थिरता आणि मुल्ये मजूबत होतील. पर्यावरण संरक्षण आणि प्रत्येक नागिरकाचे मुलभूत अधिकार मजबूत होतील.      

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT