DK Shivkumar 
देश

Video: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेत म्हटलं 'नमस्ते सदावत्सले...'; व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं शिवकुमार भलतेच चर्चेत आले आहेत. कर्नाटकात सध्या काँग्रेसची सत्ता असून आरएसएस काँग्रेसची कट्टर विरोधी संघटना आहे.

Amit Ujagare

बंगळुरु : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विधानसभेत चर्चा सुरु असताना चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिज्ञा 'नमस्ते सदावत्सले...' म्हटली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं शिवकुमार भलतेच चर्चेत आले आहेत. कर्नाटकात सध्या काँग्रेसची सत्ता असून आरएसएस काँग्रेसची कट्टर विरोधी संघटना आहे.

नमस्ते सदावत्सले हे आरएसएसची पारंपारिक प्रतिज्ञा असून संघाच्या प्रत्येक शाखेमध्ये ती नियमितपणे म्हटली जाते. कर्नाटकच्या विधानसभेचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असून यावेळीच सभागृहात चर्चेदरम्यान शिवकुमार यांनी ही प्रतिज्ञा म्हटली. यावेळी त्यांनी लहानपणीची आठवण सांगताना म्हटलं की, मी शाळेय विद्यार्थी असताना बंगळुरुच्या राजाजीनगर भागातील आरएसएसच्या शाखेत जायचो.

त्यामुळं ती आठवण सांगताना त्यांनी आरएसएसची प्रतिज्ञा 'नमस्ते सदावत्सले, मातृभूमी...' उपस्थितांना म्हणून दाखवलं. पण त्यांच्या या कृत्रीमुळं ते चर्चेत आले आहेत कारण, शिवकुमार ज्या काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्या काँग्रेसनं इतिहासापासून कायमच संघाच्या विचारधारेवर आणि संघाच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली आहे. सध्या काळात तर काँग्रेसविरोधी संघ अशीच परिस्थिती आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपची आरएसएस ही मातृसंघटना आहे.

शिवकुमार यांनी आरएसएसची प्रतिज्ञा जरी म्हणून दाखवली असली तरी त्यामुळं निर्माण झालेल्या चर्चा खोडून काढताना आपण कुठलाही पॉलिटिकल सिग्नल दिला नसल्याचं म्हटलं आहे. मी काँग्रेसमन म्हणूनच जन्माला आलो असून माझं रक्त, जीवन आणि सर्वकाही हे फक्त काँग्रेससाठीच वाहिलेलं आहे. मला हे माहिती आहे की आरएसएसचा कर्नाटकात आपली संस्था कशी बांधत आहे, शाळा कशा ताब्यात घेत आहे. मी पक्का काँग्रेसमन असून माझ्या सर्व ताकदीनिशी काँग्रेसला पुढे नेण्याचं काम करत राहील.

डी के शिवकुमार यांच्या या कृतीवर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी ट्विटरवरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की, "शिवकुमार यांनी आरएसएसची प्रतिज्ञा 'नमस्ते सदावत्सले मातृभूमी' म्हटल्यानं राहुल गांधी तसंच गांधी वड्रा कुटुंबियांचे जवळचे सहकारी हे आयसीयूत किंवा कोमा मोडमध्ये गेले असतील"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT