Mamdani Gujarat riots comment : अमेरिकेतील सर्वात मोठे शहर असलेल्या न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीमुळे भारतात वादळ उठले आहे. महापौर पदाच्या शर्यतीतील डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जोहरान ममदानी त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. त्यांच्या एका विधानामुळे भारतात खळबळ उडाली आहे. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता त्यांचे काही भारत विरोधी व्हिडीओ, ट्विट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
जोहरान ममदानी भारतीय वंशाचे असल्याने त्यांचे विधानांची भारतात जोरदार चर्चा आहे. प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक मीरा नायर या त्यांच्या आई आहेत. तर मेहमुद ममदानी हे त्यांचे वडील असून ते मुळचे गुजरातचे आहेत. जोहरान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेल्या दंगलींबाबत विधान केले आहे.
मे 2025 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांना मोदींसोबत सार्वजनिक रॅलीमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न ममदानी यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी नाही सांगितले. त्यावर बोलताना ते म्हणाले, मी गुजराती मुस्लिम असल्याचे सागंताच लोकांना आश्चर्य वाटते. माझे वडील एक गुजराती मुस्लिम कुटुंबातील आहेत. ते (पंतप्रधान मोदी) असे व्यक्ती आहेत, ज्यांनी गुजरातमधील मुस्लिमांचा सामुहिक नरसंहार करण्यासाठी मदत केली होती.
ममदानी यांचा याचा हा व्हिडीओ व्हायरल होण्याबरोबरच त्यांचे काही जुने भारतविरोधी व्हिडीओ आणि ट्विटही प्रचंड व्हायरल होत आहेत. खासदार कंगना राणावत यांच्यासह अनेकांनी हे व्हिडीओ, ट्विट पोस्ट करत त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीही एक ट्विट करत त्याचा निषेध केला आहे.
सिंघवी यांनी म्हटले आहे की, ‘जोहरान ममदानी जेव्हा आपले तोंड उघडतात, तेव्हा पाकिस्तानची पीआर टीम सुट्टीवर जाते. भारताला अशा शत्रूंची गरज नाही, त्यांच्याकडे न्यूयॉर्कमध्ये खोटे बोलणारे त्यांच्यासारखे मित्र आहेत.’ राजकीय विश्लेषक उमर गाझी यांनीही ममदानी यांचे विधान खोटे असल्याचे म्हटले आहे. ममदानी यांचे विधान केवळ भडकाऊ नाही तर असत्यही आहे. गुजरातध्ये 60 लाखांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या असून त्यांचे अस्तित्व नाकारत त्यांचा अपमान केला जात आहे, असे गाझी यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.