Vote Chori Sarkarnama
देश

Vote Chori news : मोदींच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पराभूत होणाऱ्या उमेदवाराला केले विजयी; राजकारणात खळबळ

Vote rigging allegation : काँग्रेससह राष्ट्रीय जनता दलाने या व्हिडीओवरून भारत निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Rajanand More

Election controversy India : महाराष्ट्र, बिहार, हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसह लोकसभा निवडणुकीतही भाजपने मतचोरी करून सत्ता मिळविल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह सर्वच विरोधी पक्ष करत आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजप घोळ करत असल्याचा दावा त्यांच्याकडून सातत्याने केला जातो. त्यातच खुद्द केंद्रीय मंत्र्यांच्या एका विधानामुळे आता खळबळ उडाली आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री व केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या जीतन राम मांझी यांनी धक्कादायक विधान केले आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. २०२० च्या निवडणुकीत २६०० मतांनी पराभूत होत असलेल्या उमेदवाराला आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगून विजय केल्याचा दावा मांझी यांनी केला आहे. यावेळी तेच उमेदवार १६०० मतांनी पराभूत झाले. पण त्यांनी मला सांगितलेच नाही, असेही मांझी यांनी म्हटले आहे.

मांझी यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नावही सांगितले. सध्या हे जिल्हाधिकारी त्रिपुरामध्ये नियुक्तीला आहेत. मांझी यांच्या या विधानानंतर आता पुन्हा एकदा विरोधकांनी भाजप व निवडणूक आयोगावर वार करण्यास सुरूवात केली आहे. तर मांझी यांनी आपल्या व्हिडीओमध्ये छेडछाड केल्याचा दावा केला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने या व्हिडीओवरून भारत निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आरजेडीने सोशल मीडियात हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, हे भारत सरकारमधील कॅबिनेट मंत्री, बिहारचे माजी मुख्यमंत्री हम पार्टीचे प्रमुख जीतन राम मांझी आहेत. ते सार्वजनिक व्यासपीठावरून निवडणूक निकालांमध्ये हेराफेरी, यंत्रणांचा वापर करून निवडणूक जिंकल्याचा शाही फॉर्म्यूला सांगत आहेत.

आता कुठे आहे निवडणूक आयुक्त, निवडणूक आयोग? हीच लोकशाही आहे का? तुमचा भांडाफोड नक्की होईल, असेही आरजेडीने म्हटले आहे. काँग्रेसनेही मांझी यांचा व्हिडीओ पोस्ट करत मतचोरीचा हा पुरावा असल्याचे म्हटले आहे. मोदींच्या मंत्र्यांच्या या विधानावरून स्पष्ट होते की, नरेंद्र मोदी, भाजप आणि यांचे मित्रपक्ष मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत. निवडणूक आयोगासोबत सेटिंग करून लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT