Narendra Modi, Amit Shah Sarkarnama
देश

Election Survey : निवडणुकीपूर्वीच्या सर्व्हेतील आकड्यांनी वाढवले भाजपचे टेन्शन; लोकसभेसाठी धोक्याची घंटा, उत्तर प्रदेशात...

BJP tension over election survey: पुढील वर्षी होत असलेल्या युपी निवडणुकीसाठी मतदारांचा कलांचा सर्व्हे समोर आला आहे. यातील आकडे हे भाजपचे टेन्शन वाढवणारे आहेत.

Roshan More

BJP performance in Uttar Pradesh: पुढील वर्षी होत असलेली उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक ही लोकसभेची सेमी फायनल समजली जात आहे. सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणाऱ्या या विधानसभेत भाजप पुन्हा सत्ता मिळवणार का याची चर्चा सुरू आहे. जर पुन्हा भाजपने येथे सत्ता मिळवली तर 2029 ची लोकसभा निवडणूक त्यांना सोपी जाईल, अशी चर्चा आहे. मात्र, एका सर्व्हेने भाजपचे टेन्शन वाढले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 'वोट वाइब'ने कोणाला किती टक्के मतं मिळतील, याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेच्या आकड्यांमध्ये भाजप पुढे दिसत असले तरी त्यांच्यामध्ये आणि समाजवादी पक्षामध्ये फार मोठे अंतर नाही.

या सर्व्हेनुसार भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळून तब्बल 41.8 टक्के मतं मिळत आहेत. तर, त्यांचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टी आणि त्यांच्या आघाडीला 38.7 टक्के मतं मिळत आहेत. या दोघांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फक्त तीन टक्क्यांचे अंतर आहे.

बसपाची स्थिती काय?

बहुजन समाजवादी पक्षाला मागील 10 ते 15 वर्षांपासून दमदार कामगिरीर करता आली नाही. या सर्व्हेमध्ये देखील त्यांना फाससा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. सर्व्हेतील आकडेवारीनुसार त्यांना केवळ पाच टक्के मतं मिळत आहेत.

10 टक्के मतदार कुंपणावर

या सर्व्हेमध्ये 10 टक्के मतदारांनी आपण अजून मत कोणाला द्यायचे हे ठरवले नसल्याचे सांगितले आहे. हे कुंपणावरची 10 टक्के मतदार हे युपीमध्ये कोणाची सत्ता येणार हे ठरवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विविध विकास कामांच्या घोषणा आणि महिलांना रोख रक्कम तसेच तरुणांना लॅटटाॅप देत ही मते आपल्याकडे आकर्षित करण्याची रणनिती योगी आदित्यनाथ यांचे सरकार करत असल्याची चर्चा आहे.

...तर भाजपला फटका

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुताचा आकडा काढता आला नाही. मित्रपक्षांमुळे ते बहुमत टिकवू शकले.लोकसभेला उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या पिछेहाटमुळे त्यांना स्वबळावर बहुत मिळाले नाही. त्यात जर विधासभेला त्यांची पिछेहाट झाली तर 2029 च्या लोकसभेला त्यांना फटका बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT