BJP Politics: ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरेंचे एवढे खासदार फोडल्यानंतरही मोदी-शहांची भीती कायम; भाजप पुढचा डाव कोणावर टाकणार?

NDA Government: दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आता 2029 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एक एक करत विरोधी पक्षांना हादरे देण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतरही भाजपची भीती अद्यापही कायम असल्याचं समोर आलं आहे.
Modi Shah tmc Shivsena  .jpg
Modi Shah tmc Shivsena .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: भाजपचा लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीतील स्वबळावर 'मिशन चारशे प्लस'चा नारा फसल्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन एनडीएचं सरकार स्थापन करावे लागले. तसेच भाजपचं लोकसभेतील दोन तृतीयांश बहुमताचं स्वप्नही भंगलं. यामुळे भाजपच्या राजकीय रणनीतीचे मुख्य सूत्रधार राहिलेल्या मोदी-शाह यांचं हवेतलं विमान जमिनीवर आलं.

दिल्लीतील भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आता 2029 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एक एक करत विरोधी पक्षांना हादरे देण्यास सुरुवात केली आहे. तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडल्यानंतरही भाजपची भीती अद्यापही कायम असल्याचं समोर आलं आहे.

भाजपला नारी शक्ती वंदन आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकांना काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी केलेल्या आक्रमक विरोध आणि मतदानादरम्यान आवश्यक असलेली दोन-तृतीयांश बहुमताची आकडेवारी हाती नसल्यामुळे लोकसभेत नामंजूर झाले. हे दोन्ही विधेयकं नामंजूर होणं हे मोदी-शाह यांच्या राजकारणाला धक्का देणारं होतं.

लोकसभेतलं दोन तृतीयांश बहुमतासाठी 360 तर राज्यसभेत हा बहुमताचा आकडा 163 इतका आहे. पण सध्याच्या संख्याबळानुसार संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहात भाजपसह एनडीएलाही हा दोन तृतीयांश बहुमताचा आकडा अद्यापतरी गाठता आलेला नाही.

Modi Shah tmc Shivsena  .jpg
Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची नेतेमंडळीनंतर पत्रकारांना अरेरावी अन् मारण्याची धमकी; एकनाथ शिंदे कठोर अ‍ॅक्शन घेणार? पहिली प्रतिक्रिया समोर

कारण पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षाचे अनुक्रमे 20 आणि 6 खासदार फोडण्यात आले आहेत. तरीही एनडीएकडे 319 खासदार आहेत. तसेच राज्यसभेत आपचे सात खासदार फोडल्यानंतरही एनडीए 153 जागांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे भाजपला लोकसभेत 40-41 तर राज्यसभेत 10 खासदारांचा आकडा कमी पडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रणनीतीनुसार भाजपनं आत्तापासूनच लोकसभेच्या 2029 च्या निवडणुकीतील मिशन चारशे प्लससाठी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचं समोर येत आहे. भाजपच्या प्लॅननुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचं मिशन 400 प्लसचं स्वप्नं भंग होण्यास कारणीभूत ठरलेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांवर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

Modi Shah tmc Shivsena  .jpg
Mahavikas Aaghadi News: सहा खासदार फुटले, आता महाविकास आघाडीच्या बैठकीला 48 पैकी तब्बल 23 आमदारांची दांडी; ठाकरे-पवार-सपकाळांची धडधड वाढली

लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीत विरोधकांच्या काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला 105 जागा मिळाल्या होत्या. तर दुसरीकडे भाजप प्रणित एनडीएला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अवघ्या 65 जागांवर पोहोचता आलं होतं. ज्या तीन राज्यांच्या जोरावर भाजपनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला होता,त्याला मोठा फटका बसला होता.

मोदी सरकारला पहिल्यांदाच एवढ्या मानहानीकारक पद्धतीनं एप्रिल महिन्यात नारी शक्ती वंदन विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना हे दोन्हीही विधेयकं मागे घ्यावे लागली होती. पण आता केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा ही दोन्हीही विधेयकं आगामी काळात पूर्ण बहुमतासह लोकसभा आणि राज्यसभेच्या पटलावर मंजुरीसाठी आणू शकते.

Modi Shah tmc Shivsena  .jpg
Narhari Zirwal : तुकाराम मुंढेंबाबत अधिवेशनात मोठ्या घडामोडी! बदलीच्या चर्चेतच मंत्री झिरवाळ यांची अचानक मोठी घोषणा

जर ही विधेयकं मंजूर झाली तर नारी शक्ती वंदन अधिनियमांतर्गत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 1/3 म्हणजेच 33% प्रतिनिधित्व देण्याचे निश्चित करण्यात येणार आहे. तर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांची फेररचना करून लोकसभेची सदस्यसंख्या 850 पर्यंत वाढवण्यात येणार आहे.

2029 च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही विधेयकांच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, राजस्थान, बिहार, झारखंड, हरयाणा, आसाम यांसारख्या राज्यांमध्ये भाजप जोरदार मुसंडी मारण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. या दोन्ही विधेयकांच्या जोरावर भाजप 2024 च्या निवडणुकीत फसलेलं मिशन 2029 च्या निवडणुकीत यशस्वी करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com