narendra modi  sarkarnama
देश

Pm Narendra Modi : 1 लाख तरूणांना राजकारणात आणणार, पण PM मोदींनी घातल्या 'या' अटी

PM Narendra Modi Independence Day Speech : देशातील घराणेशाही, जातीयवाद भारताच्या लोकशाहीचं नुकसान करत आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

Akshay Sabale

भारत 78 वा स्वातंत्र दिन साजरा करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. 60 वर्षांनंतर लागोपाठ तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी दिली.

लोकांचे आशीर्वाद व्यर्थ जाणार नाहीत. प्रत्येकाची सेवा, प्रत्येक कुटुंबाची आणि प्रत्येक क्षेत्राची सेवा करत देशाला विकासाच्या नव्या उंचीवर पोहचविण्याचा संदेश मिळाला आहे. या लाल किल्ल्यावरून मी देशवासियांना नमन करतो, असं मोदींनी ( Narendra Modi ) म्हटलं.

'समृद्ध' आणि 'विकसित' भारताचे लक्ष्य 2047 पर्यंत भारत पूर्ण करू शकतो, असा विश्वास पंतप्रधान मोदी ( Narendra Modi ) यांनी व्यक्त केला. त्यासह महिला, उद्योगधंदे, शिक्षण, आरोग्य यासह विविध क्षेत्रांवर पतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाष्य केलं. यावेळी एक लाख तरूणांना राजकारणात आणणार, अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. यासाठी काही अटी पंतप्रधानांनी घातल्या आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "देशातील घराणेशाही, जातीयवाद भारताच्या लोकशाहीचं नुकसान करत आहे. त्यापासून मुक्तक्ता मिळाली पाहिजे. त्यासाठी एक मिशन हाती घेतलं जाणार आहे. या राजकारणात 1 लाख तरूणांना पुढे आणले जाईल."

"या तरूणांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसेल, त्यांचे वडील, काका किंवा मामा कोणीही राजकारणात नसेल. हे तरूण जिल्हा परिषद, पंचायत, विधानसभा किंवा लोकसभा कुठेही काम करतील. या तरूणांनी कोणत्या पक्षात यावे, याची सक्ती नाही. ते कोणत्याही पक्षात जाऊ शकतात. पण, याने देशाला घराणेशाही आणि जातीयवादापासून मुक्ती मिळेल," असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT