narendra modi
narendra modi sarkarnama

PM Narendra Modi : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर पहिल्यांदाच पंतप्रधानांनी केलं भाष्य; म्हणाले...

PM Narendra Modi Independence Day Speech : आरक्षणावरून बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला होता. यानंतर तेथील हिंदुंच्या घरांना लक्ष्य करण्यात आलं होतं.
Published on

बांगलादेशातील हिंसाचार आणि तेथील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाष्य केलं आहे. बांगलादेशीतल हिंदू आणि अल्पसंख्याकांची काळजी घेतली पाहिजे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. तेथील परिस्थिती लवकर सामान्य व्हावी, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी ( Narendra Modi ) म्हणाले, "बांगलादेशात जे काही घडले, त्याबद्दल एक शेजारील देश या नेत्यानं काळजी वाटणं साहजिक आहे. तेथील परिस्थिती लवकरच सामान्य होईल, अशी मला आशा आहे. बांगलादेशातील हिंदू समाजाची सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, अशी देशवासीयांची इच्छा आहे. अंतरिम सरकार हिंदू समाजाच्या सुरक्षेबाबत योग्य ती काळजी घेईल."

narendra modi
Independence Day 2024 : 'समृद्ध' अन् 'विकसित' भारताचे स्वप्न कसे पूर्ण करणार? पंतप्रधान मोदी म्हणाले...

"आपल्या शेजारील देशांनी सुख आणि शांतीचा मार्ग अवलंबावा, अशी भारताची नेहमीच इच्छा असते. आगामी काळात बांगलादेशमधील विकासासाठी आमच्या शुभेच्छा आहेत," असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

narendra modi
Independence Day 2024 : वैद्यकीय क्षेत्राबाबत लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; काय म्हणाले?

नेमकं काय घडलं?

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता पसरली होती. यानंतर बांगलादेशमध्ये सर्वत्र जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली. शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात आश्रय घ्यावा लागला. शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर हिंदू, त्यांची घरे आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हिंसक हल्ले झाले. त्यात अनेकांचा मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com