Waqf Board Bill Parliament  Sarkarnama
देश

Waqf Board Amendment Bill Latest Update: मोठी बातमी: मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर अखेर लोकसभेत 'वक्फ दुरूस्ती विधेयक' मंजूर; पण...

Waqf Amendment Bill : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले होते. हे विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेत मध्यरात्री उशिरा मतदान पार पडलं.

Deepak Kulkarni

New Delhi : लोकसभेमध्ये बुधवारी(ता.2 एप्रिल) वक्फ सुधारणा विधेयक सादर करण्यात आलं.संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक सादर केल्यानंतर सत्ताधारी -विरोधकांमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत झालेल्या चर्चेनंतर मध्यरात्री या विधेयकावर मतदान पार पडलं. या मतदानानंतर अखेर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक बहुमतानं मंजूर (Waqf Amendment Bill) करण्यात आलं.

लोकसभेमध्ये बुधवारी वक्फ दुरुस्ती विधेयक सादर करण्यात आलं. या विधेयकावर मध्यरात्री उशिरा मतदान पार पडलं. मात्र, हे विधेयक स्वबळावर पास करण्याएवढं संख्याबळ एकट्या भाजपकडं नव्हतं. लोकसभेमध्ये भाजपकडे 240 सदस्य आहेत. तर, विधेयक मंजूर होण्यासाठी 272 सदस्यांच्या पाठिंंब्याची आवश्यकता होती. त्यामुळे स्वबळावर भाजपकडे हे विधेयक पास करण्यासाठी बहुमताचा आकडा नव्हता.

पण एनडीएतील घटक पक्षांच्या साहाय्यानं वक्फ दुरूस्ती विधेयक अखेर मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर लोकसभेत मंजूर झाले. यावेळी विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर, विरोधात 232 मते पडली. महत्त्वाची बाब म्हणजे वक्फ दुरूस्ती विधेयकासाठी एकीकडे मतदान होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मात्र सभागृहात उपस्थित नसल्याचं दिसून आलं. एवढं महत्त्वाचं बिल पास होत असताना मोदींनाच दांडी मारल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्वबळावर जरी भाजपकडे हे विधेयक पास करण्यासाठी बहुमत नसले तरी भाजप नेतृत्व करत असलेल्या एनडीएची सदस्य संख्या मिळून 294 आहे. त्यामध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे एनडीच्या सदस्यांच्या मदतीने हे विधेयक भाजप बहुमताने मंजूर करण्यात मोदी सरकारला काहीही अडचण आली नाही.

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मागण्या मान्य करत भाजपकडून विधेयकामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे टीडीपी आणि जनता दल संयुक्त यांच्याकडून विधेयकाच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हिपही जारी करण्यात आला होता.

मतदानाआधी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक 2025 वरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, हे विधेयक मुस्लिमांच्या हिताचे आहे आणि वक्फ बोर्डाला बळकटी देण्यासाठी आणण्यात आले आहे. तसेच विरोधी पक्ष मुस्लिमांच्या मतपेढीचे राजकारण करत असल्याने या विधेयकाला विरोध करत असल्याचा आरोपही शाह यांनी यावेळी केला.

तसेच मी या सभागृहाद्वारे देशातील मुस्लिमांना सांगू इच्छितो की वक्फमध्ये एकही गैर-मुस्लिम येणार नाही. या कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. पण वक्फ बोर्ड आणि वक्फ कौन्सिल काय करतील? वक्फ मालमत्ता विकणाऱ्यांना पकडून बाहेर फेकले जाईल असा इशाराही अमित शाह यांनी सभागृहात दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT