Suresh Dhas : मुंडेंच्या बीडमधील राजकीय गुन्हेगारी; आमदार धसांनी 'सिंघम', 'शोले', 'कालिया', 'गंगाजल', 'नायक', 'सरकार' ते 'परिंदा' चित्रपटापर्यंत...

BJP MLA Suresh Dhas exclusive interview Sarkarnama political crime Beed referencing films Maharashtra politics : भाजप आमदार सुरेश धस यांनी 'सरकारनामा' दिलेल्या विस्फोटक मुलाखतीत वेगवेगळ्या चित्रपटांचा संदर्भ देत बीडमधील राजकीय गुन्हेगारीवर मार्मिक भाष्य केले.
Suresh Dhas1
Suresh Dhas1Sarkarnama
Published on
Updated on

Beed Politics : बीडमधील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार सुरेश धस पुढे आले, अन् बेधडक बोलण्यामुळे चर्चेतही आले. विशेष म्हणजे, धस हे आपल्या भाषण आणि मुलाखतींमध्ये अनेकदा चित्रपटांचे उल्लेख करत असतात.

बीडमधील राजकीय गुन्हेगारी सांगताना त्यांनी 'परिंदा' चित्रपटाचा संदर्भ दिला. 'परिंदा' चित्रपटाची दुसरी स्टोरी म्हणजे, 'परळी'! तू उसको मार अन् मागून त्याला पाठवायचं, तू उसको मार. अगर उनसे उसको मारा नहीं तो, तू दोनों को मार डाल. तशी काहीशी परळीची अवस्था झाली असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. गंभीर गुन्हे सातत्याने वाढत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर बोलताना धस यांनी ‘सिंघम’ चित्रपटातील नायकाप्रमाणे कडक आणि निडर पोलिस असावे, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

तुरुंगात वाल्मिक कराड व सुदर्शन घुळे या दोघांना मारहाण झाल्याचा दावा धस यांनी केला. त्यावेळी ‘शोले’ चित्रपटाचा संदर्भ त्यांनी दिला. ‘शोले’मध्ये आम्ही पाहिलंय की, अधिकारी म्हणतात ‘जेल के कोने कोने में हमारे जासूस है’. मग हे जासूस काय करत होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे ‘कालिया’ चित्रपटात आम्ही तुरुंगात झालेल्या हाणामाऱ्या पाहिल्या होत्या. आता बीडच्या (BEED) तुरुंगात 'कालिया' तयार झालाय की काय कुणास ठाऊक असेही ते म्हणाले.

Suresh Dhas1
Chandrashekhar Bawankule fake letterhead : मंत्री बावनकुळेंचं लेटरहेड बनावट अन् सही देखील..; कोणी केलं? कसं केलं? पोलिस तपासावर

गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्थेबद्दल बोलताना भाजप (BJP) आमदार सुरेश धस यांनी ‘गंगाजल’ चित्रपटाचा संदर्भ दिला होता. 'गंगाजल' चित्रपटात दाखवल्याप्रमाणे प्रशासनाने ठरवले तर गुन्हेगारीचे उच्चाटन होऊ शकते.

Suresh Dhas1
Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात बीडच नाही तर देशभरात पोहचलेल्या 'आकाचा...आका' शब्दाची सुरेश धसांनीच सांगितली संपूर्ण हिस्ट्री !

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत बोगसं बिले उचलण्यात आली, असा दावा करताना धस यांनी एका दिवसाच्या मुख्यमंत्री संकल्पनेवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी ‘नायक’ चित्रपटातील प्रसंगाचा उल्लेख केला. एखाद्या सामान्य व्यक्तीला तात्पुरते पदावर बसवले तर काय बिघडेल असा विचार राज्यकर्ते करतात तेव्हा काहीही होऊ शकते असे सांगून कार्यकारी अभियंता पदावर तात्पुरती नेमणूक करून 73 कोटी रुपये उचलले गेल्याच आरोप त्यांनी केला होता.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आणि राजकीय खेळींवर भाष्य करताना त्यांनी ‘सरकार’ या चित्रपटाचा संदर्भ दिला होता. तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर भाष्य करताना सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची अवस्था कशी होते याबद्दल बोलताना धस यांनी फिल्मी डायलॉग बोलत फिरकी घेतली. निवडणुकीच्या आधी सदस्य विचारतात त्याप्रमाणे “सरपंच क्या है तेरा इरादा” असे सीआयडी स्टाइलने तर निवडणुकीनंतर काय होते यावर “क्या हुआ तेरा वादा” असे सुरात म्हटले. ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर देखील धस यांनी माध्यमांना चित्रपटाबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली.

नुकत्याच ‘सरकारनामा’ला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत धस यांनी ‘परिंदा’ चित्रपटाचा उल्लेख केला. मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर आधारित या चित्रपटात गुन्हेगारी कशी वाढते, त्याचा समाजावर आणि वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होतो, हे दाखवले आहे. 'परिंदा' चित्रपटाची दुसरी स्टोरी म्हणजे, 'परळी'! तू उसको मार अन् मागून त्याला पाठवायचं, तू उसको मार. अगर उनसे उसको मारा नहीं तो, तू दोनों को मार डाल. अशीच काहीशी परळीची अवस्था झाली आहे. चित्रपटात एकमेकांना मारण्यासाठी प्रवृत्त केले जाते आणि हिंसा वाढत जाते, तशीच स्थिती परळीमध्ये असल्याचे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com