Yogi Adityanath on Waqf Board sarkarnama
देश

CM Yogi Action Mode : 'वक्फ' बोर्ड दुरूस्ती विधेयक संसदेत पारीत होताच मुख्यमंत्री योगी 'अ‍ॅक्शन मोडवर'!

Yogi Adityanath on Waqf Board : मोदी अन् शहांचेही मानले आभार ; जाणून घ्या नेमका काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

Mayur Ratnaparkhe

Waqf Bill News: संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक प्रदीर्घ चर्चेअंती बहुमताने पारीत झाले आहे. सरकारने दावा केला आहे की या दुरूस्ती विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि या समुदायातील महिलांची स्थिती सुधारण्यास मोठी मदत होईल. लोकसभेत बुधवारी रात्री उशीरा जवळपास २ वाजता हे पारीत केले गेले होते. तर राज्यसभेत यास गुरुवारी मध्यरात्री यास मंजूरी मिळाली. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहा पारीत होताच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत.

मुख्यमंत्री योगी(Yogi Adityanath) सरकारने राज्यभरातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की, मोहीम राबवून अशा वक्फ संपत्ती शोधून काढाव्यात, ज्या महसूल नोंदीत नाहीत आणि ज्यांना नियमांकडे दुर्लक्ष करून वक्फ घोषित केलं गेलं आहे. या संपत्ती शोधून त्या जप्त केल्या जातील.

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशात वक्फ बोर्डाच्यावतीने ज्या संपत्तींचा दावा केला गेला आहे. त्यापैकी बहुतांश कोणाचाही अधिकृत रेकॉर्ड उपलब्ध नाही. रेव्हेन्यू रेकॉर्डनुसार सुन्नी वक्फ बोर्डाच्या केवळ २५०० पेक्षा जास्त संपत्तींची नोंद आहे. तर शिया वक्फ बोर्डाची ४३० प्रॉपर्टीच रजिस्टर आहे. तर वक्फ बोर्डाचे आकडे काहीतरी वेगळं सांगताना दिसत आहेत. वक्फनुसार हे आकडे यापेक्षा खूप जास्त आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाची १,२४, ३५५ संपत्ती आणि शिया वक्फ बोर्डाची ७,७८५ संपत्ती आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी एका सभेत म्हटले की, वक्फच्या नावावर त्यांनी प्रयागराज आणि अन्य शहरांमध्येही जमीनवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा आम्ही महाकुभंचे आयोजन करत होतो, तेव्हा वक्फ बोर्ड मनमानी पद्धतीने विधान करत होते, प्रयागराज कुंभची जमीनही वक्फची आहे. हे वक्फ बोर्ड आहे की भूमाफिया बोर्ड?

याशिवाय, राज्यात भू माफियांना सहन केले जाणार नाही. आम्ही आधीच उत्तर प्रदेशातून माफियांचा सफाया केला आहे. आता उत्तर प्रदेशात माफियागिरी चालणार नाही आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहील. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहाचे आभारी आहोत. त्यांनी वक्फ बोर्डावर लगाम लावला आणि संसदेत हे पारीत करून कल्याणकारी काम केलं आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT