Israel-Palestine War Sarkarnama
देश

Israel-Palestine War Update: इस्राईलच्या सैनिकांनी गाझा पट्टीला घेरले; सहाव्या दिवशीही युद्ध सुरूच...

Israel vs Palestine: पॅलेस्टाईनच्या हमासने इस्राईलवर केलेला हा हल्ला या दशकांतील सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येते.

Ganesh Thombare

Israel-Palestine War Update : पॅलेस्टाईनच्या हमास या दहशतवादी संघटनेने इस्राईलवर रॉकेट हल्ला केला. या हल्ल्यात हजारो जण मारले गेले. हमास संघटनेने केलेल्या हल्याला इस्राईलनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पॅलेस्टाईनच्या हमासने इस्राईलवर केलेला हा हल्ला या दशकांतील सर्वात मोठा हल्ला असल्याचे सांगण्यात येते. आता इस्राईलनेही प्रत्युत्तर देत गाझा पट्टीवर अनेक क्षेपणास्रे डागली आहेत. तसेच इस्राईलच्या सैनिकांनी गाझा पट्टीला घेरले असून, सहाव्या दिवशीही युद्ध सुरूच आहे.

इस्राईलच्या सैनिकांनी गाझा पट्टीला घेरले असले तरीही दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात रॉकेट आणि बॉम्ब हल्ले करण्यात येत आहेत. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासने केलेल्या हल्ल्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी गेल्या पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ला करत गाझा पट्टीला घेरले आहे. इस्राईल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत हजारो जण मारले गेले आहेत.

या युद्धाचे परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर होण्याची शक्यता आहे. या युद्धाचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आर्थिक घडामोडींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तान, सीरिया, इजिप्तसारख्या अनेक देशांनी हमासच्या हल्ल्यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समर्थन दर्शवले आहे, तर या संघर्षाच्या काळात अमेरिका इस्राईलच्या पाठीशी उभी आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राईलला लष्करी शस्त्रे पाठवली आहेत, तर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीदेखील पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आणि पाठिंबा देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे इस्राईलची बाजू काहीशी वरचढ दिसत आहे. मात्र, हे युद्ध कधी थांबणार, याकडे आता जगाचे लक्ष लागले आहे.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT