Israel-Palestine War Update : इस्राईल-हमास युद्धात भारताची साथ कुणाला ?

Israel-Palestine War : या संघर्षाबाबत जगभरातील राष्ट्रांची भूमिका स्पष्ट होत आहेत.
Israel-Palestine War Update
Israel-Palestine War Update Sarkarnama
Published on
Updated on

Israel-Palestine War Update : पॅलेस्टिनी गट हमासने इस्राईलवर या दशकांतील सर्वात मोठा हल्ला केला आहे. मात्र, इस्राईलनेही प्रत्युत्तर देत गाझा पट्टीवर अनेक क्षेपणास्रे डागली आहेत. तसेच, इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सरकारने याला 'युद्ध' आणि '9/11' सारखा हल्ला म्हटले आहे. आता या संघर्षाबाबत जगभरातील राष्ट्रांची भूमिका स्पष्ट होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्राईलशी 'एकजूट' दाखवण्याबाबत भूमिका स्पष्ट करत आहेत. (Latest Marathi News)

इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला आहे की, 84 राष्ट्रांनी त्यांच्या समर्थनार्थ निवेदने जारी केली आहेत. ही राष्ट्रे हमासच्या हल्ल्यांचा निषेधही करत असल्याचा दावा इस्राईलने केला आहे. इकडे मध्यपूर्वेतील अनेक देश इस्राईलवरील हल्ल्याचे कौतुक करत आहेत. इराणच्या मदतीने हमासने इस्राईलवर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.

'हे' देश इस्राईलला पाठिंबा देत आहेत -

या संघर्षाच्या काळात अमेरिका इस्राईलच्या पाठीशी उभी असल्याचे दिसते. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राईलला अनेक लष्करी शस्त्रे पाठवली आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पाठिंबा देण्याचे आणि शांततेचे आवाहन केले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हल्ल्याचा निषेध केला आणि पाठिंबा देण्याचा शब्द दिला आहे.

ऑस्ट्रेलियाही इस्त्राईलच्या पाठीशी असल्याचे म्हटले आहे. तसेच, या संघर्षात सर्वसामान्य नागरिकांचे नुकसान होऊ नये, असे आवाहन केले. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी हमास हल्ल्याचा निषेध केला आहे, तर पॅलेस्टिनी गटाने केलेल्या हल्ल्याचा नॉर्वेनेही निषेध केला आहे. याशिवाय ऑस्ट्रिया, जर्मनी, कॅनडा, पोलंड, स्पेन आणि युरोपियन युनियनही इस्राईलच्या समर्थनात दिसत आहेत.

'या' देशांचा हमासला पाठिंबा -

इस्राईलविरुद्धच्या हल्ल्यांमध्ये इराण समर्थक हिज्बुल्लाचाही हात असल्याची शक्यता आहे. इराणचे अध्यक्ष इब्राहिम रायसी यांनीही पॅलेस्टिनी गटाने केलेल्या हल्ल्याचे कौतुक केले आहे. दक्षिण आफ्रिकाही पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभी असल्याचे दिसत आहे. या हल्ल्याच्या मोहिमेत हमासला पाठिंबा देणार असल्याचे येमेनची बंडखोर संघटना हैतीने म्हटले आहे.

तर दुसरीकडे सौदी अरेबियाने हे युद्ध त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. सौदी अरेबिया आणि इस्राईलमधील संबंध सामान्य बनण्यामध्ये 'पॅलेस्टाईन तणाव' हे एक प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे. या हिंसाचारासाठी कतारने इस्राईलला जबाबदार धरले आहे.

भारताची भूमिका काय ?

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही, तर पंतप्रधान मोदी या हल्ल्यावर आश्चर्य व्यक्त करत आहेत. इस्राईलमधील या विध्वंसाला 'दहशतवादी हल्ला' असं संबोधले आहे. त्यांनी इस्राईलशी 'एकजूट ' दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

(Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com