Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Wayanad Bypoll Results : प्रियांका गांधींची प्रतिष्ठा पणाला; वायनाडमधून पहिला कल हाती

First trends from Wayanad Priyanka Gandhi's political reputation: राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिडणूक होत आहे.

Rajanand More

Kerala News : केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारसंघातील सुरूवातीच्या फेऱ्यांचे कल हाती आले असून यामध्ये त्यांनी मोठी आघाडी घेत विक्रमी मताधिक्याच्या दिशेने आगेकुच केल्याचे दिसते.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे वायनाडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्याविरोधात सीपीआयने सत्येन मोकेरी तर भाजपने नव्य हरिदास यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी झाली. सुरूवातीपासूनच प्रियांका गांधी यांच्या विजयाबाबत काँग्रेसकडून दावा केला जात होता.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

मोजमोजणीला सुरूवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून प्रियांका गांधी आघाडीवर आहेत. सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, प्रियांका गांधी यांना सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये सुमारे 46 हजार मते मिळाली आहेत. त्यांनी सीपीआयच्या उमेदवाराला तब्बल 33 हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर टाकले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

प्रियांका गांधी यांना या मतदारसंघातून मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे सध्याच्या कलांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्या राहुल गांधी यांच्या मताधिक्याचा विक्रम मोडणार का, याबाबतच आता उत्सुकता वाढली आहे. त्यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने काँग्रेसला त्यांचा मोठा विजय अपेक्षित आहे. त्यासाठी पक्षाकडून ताकदही लावण्यात आली होती.

प्रियांका गांधी विजयी झाल्यास गांधी घराण्यातील तीन सदस्य संसदेत असतील. त्यांच्या आई सोनिया गांधी या राज्यसभेच्या खासदार आहेत. तर बंधू राहुल गांधी रायबरेलीचे खासदार असून लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही आहेत. प्रियांका गांधी पहिल्यांदाच संसदेत पाऊल ठेवतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT