महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी Maharashtra Assembly Election 2024 वीस तारखेला मतदान झाले. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून या निवडणुकीत कोण विजयी गुलाल उधळणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच एकूण 158 पक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग आहेत. विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी ६५ टक्के इतके विक्रमी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणी Maharashtra Vidhan Sabha Election Result होणार आहे. राज्यातील 288 जागांसाठी 4 हजार 136 उमेदवार रिंगणात आहेत. यात ३ हजार ७७१ पुरुष, ३६३ महिला आणि दोन इतर उमेदवार आहेत. यंदाच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 158 पक्ष यंदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. तर अपक्ष 2 हजार 86 उमेदवार रिंगणात आहेत. महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होत आहे. त्याशिवाय मनसे, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम व त्याशिवाय परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीमध्ये प्रहार, स्वतंत्र भारत पक्ष, स्वराज्य पक्ष, स्वाभिमानी शेतकरी हे पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीत पणाला लागली आहे. बारामती, इंदापूर, दौंड, नांदेड येवला, कवठे- महांकाळ, माहिम, वरळी, कराड दक्षिण, कोल्हापूर उत्तर, परळी या मतदारसंघातील लढतींकडे सगळ्याचं लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.