Basavaraj Bommai Sarkarnama
देश

‘आम्ही सरकार चालवत नसून कसेतरी सांभाळत आहोत’ : मंत्र्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

या ऑडिओ क्लिपमुळे भारतीय जनता पक्षात एकच खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

बंगळूर : ‘आम्ही सरकार चालवत नाही, ते कसे तरी सांभाळत आहोत,’ असे वक्तव्य असणारी व्हिडिओ क्लिप कर्नाटकमधील (Karnataka) भाजपचे (BJP) कायदामंत्री जे. सी. मधुस्वामी यांंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे भारतीय जनता पक्षात एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या समोरील अडचणीही वाढल्या आहेत. ('We are not running the government but managing it somehow': Minister's audio clip viral)

कर्नाटकचे कायदा मंत्री मधुस्वामी आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांच्यातील फोनवरील संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. भास्कर यांनी कर्नाटकातील व्हीएसएसएन बँकेच्या विरोधात शेतकऱ्यांची तक्रार मधुस्वामी यांच्याकडे केली होती. त्यावेळी मधुस्वामी यांनी ‘आम्ही सरकार चालवत नाही, पुढील सात ते आठ महिने आम्ही कसे तरी सांभाळत आहोत’ असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने कर्नाटकात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांनी मधुस्वामी यांच्या विधानाबद्दल उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे.

मधुस्वामी यांच्याकडे भाजपच्या एका मंत्र्याच्या कथित निष्क्रियतेबद्दल सामाजिक कार्यकर्ते भास्कर यांनी तक्रार केली आहे. त्यावर ‘मी हा विषय सहकार मंत्री एस. टी. सोमशेकर यांना सांगितला आहे. पण ते कोणतीही कारवाई करत नाहीत, त्यामुळे आम्ही काय करावे, असेही मधुस्वामी यांनी म्हटले आहे. या क्लिपची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, मधुस्वामी यांच्या या विधानाचा भाजपच्या सहकारी मंत्र्यांनी जोरदार समाचार घेतला आहे. मधुस्वामी यांनी असे विधान करण्यापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. मंत्री असल्याने ते सरकारचा भाग आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते सहभागी असतात. त्यामुळे सरकारच्या निर्णयामध्ये त्यांचाही सहभाग आहे. मंत्रीपदावर असणाऱ्यांनी अशी विधाने करणे योग्य नाही, असा टोला मंत्री मुनीरत्न यांनी मधुस्वामी यांना लगावला आहे. मधुस्वामी यांचे हे म्हणणे चुकीचे आहे, असे उत्तर सहकार मंत्री एस. टी. सोमशेखर यांनी मधुस्वामी यांना दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT