'वैभव नाईकांचा पराभव करण्यासाठी उदय सामंतांनी विरोधी उमेदवाराला ५० लाख दिले'

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत असतानाही गेल्या अडीच वर्षांत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या लोकांना पोसण्याचे कामही केले आहे.
Vinayak Raut-Vaibhav Naik-Uday Samant
Vinayak Raut-Vaibhav Naik-Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

कणकवली : शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik )यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विरोधी उमेदवाराला ५० लाख रुपये दिले होते, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सामंत यांच्यावर केला आहे. (Uday Samant gave 50 lakhs to the opposition candidate to defeat Vaibhav Naik)

Vinayak Raut-Vaibhav Naik-Uday Samant
‘पोलिसांच्या ट्रकमधून भाजपला पैसा पोहोचतो!महाराष्ट्रातील सरकार कांदा-बटाट्यावर बदलले नाही’

कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली. त्या बैठकीत खासदार राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शिवसेनेत असतानाही गेल्या अडीच वर्षांत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या लोकांना पोसण्याचे कामही केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत वैभव नाईक यांच्याविरोधात नारायण राणेंचा उमेदवार होता. वैभव नाईक हे आपल्या शिवसेना पक्षाचे उमेदवार असतानासुद्धा समोरच्या उमेदवाराला उदय सामंत यांनी ५० लाख रुपये दिले आणि नाईक यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला.

Vinayak Raut-Vaibhav Naik-Uday Samant
'बंडखोर १६ आमदार अपात्र ठरू शकतात; पण...'

दरम्यान, शिवसेना आणि राणे यांच्यातील वादानंतर आता विनायक राऊत आणि उदय सामंत यांच्यातही कोकणात वाट पेटण्याची चिन्हे आहेत. कारण राऊत यांनी सामंतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राज्यात कुठेही घडत नसेल असे अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील पालीच्या घरातून उदय सामंत करत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

Vinayak Raut-Vaibhav Naik-Uday Samant
मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना नेत्याला पत्र...!

राऊत म्हणाले, ‘राज्यात कुठेही घडत नाही, असे राजकारण रत्नागिरीच्या पाली येथे घडते. सामंतांनी विरोधी उमेदवाराला ५० लाख रुपये देऊन वैभव नाईकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण वैभव नाईक हे सिंधुदुर्गाचं वैभव आहे. उदय सामंत, दीपक केसरकर मंत्री झाले, त्यांना शुभेच्छा.. पण, पालकमंत्री असताना सामंत हे टक्केवारी घेऊन कामं करत होते, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com