West Bengal Assembly Election 2026 : असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम (AIMIM) पक्षाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दमदार कामगिरी केली. बिहार विधानसभा निवडणुकीत देखील पाच जागांवर विजय मिळवला.
यानंतर देशात स्थान बळकट करण्याची AIMIMने रणनीती आखत, थेट पश्चिम बंगालच्या मैदानात 12 जागांवर लढाई केली. AIMIMच्या हाती तिथं भोपळा मिळाला. परंतु त्याचा फायदा भाजपला झाल्याचा आता समोर आलं आहे.
पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभा निवडणुकीच्या मैदानात AIMIMला मतदारांनी नाकारल्याचे दिसते. असदुद्दीन ओवेसी या झटका असल्याचे मानले जाते. AIMIMने दिलेले सर्व 12 उमेदवार हे, मुस्लिमबहुल भागात दिले होते.
पश्चिम बंगालमध्ये हुमायू कबीर यांचा आम जनता उन्नयन पार्टी (एजेयूपी) सोबतची युती तुटल्यानंतर AIMIMने स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली. यातून पुढे AIMIMने मुस्लिमबहुल (Muslim) भागात 12 जागांवर उमेदवार दिले. या सर्व उमेदवारांचा निवडणुकीत पराभव झाला.
असदुद्दीन ओवेसी यांनी मालदा जिह्यातील मोथाबारी आणि सुजापूर, मुर्शिदाबादच्या सुती, रघुनाथगंज, कांडी, बिरभूमी, नलहाटी, मुरारई, उत्तर 24 परागना जिह्यातील हाबरा, बारासात, बशीर घाट दक्षिण आणि उत्तर दिनाजपूरच्या करांदिघी जागांवर उमेदवार उभे केले होते. इथल्या उमेदवारांच्या पराभवाबरोबरच, पश्चिम बंगालमध्ये AIMIMच्या हाती भोपळा लागला.
मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूर हा भाग मुस्लिमबहुल भाग आहे. या जिल्ह्यात मतदार यादीत SIRमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली होती. यावरून मोठा वाद झाला होता.
यातच हुमायू कबीर यांचा पक्ष एजेयूपी आणि असदुद्दीन ओवेसी AIMIM, या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने तिथं मुस्लिम मतांची विभागणी झाली. याचा फायदा अप्रत्यक्षरित्या भाजपला फायदा झाला आहे.
मोथाबारीमध्ये असदुद्दीन ओवेसीच्या उमेदवाराला केवळ 995 मते मिळाली आहेत. सुजापूरमधील उमेदवाराला 2500 मते, सुतीमध्ये 741 मते, रघुनाथगंजमध्ये 1400 मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.