Akola Mayor : भाजपच्या विजयानंतर अकोला महापालिकेत 'काँग्रेस-AIMIM'चा राडा; संतप्त नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावले, बांगड्यांची फेकाफेक

Akola Mayor Election: BJP Sharda Khedkar Elected, Ruckus Between Congress & AIMIM Councillors : अकोला महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान होताच, काँग्रेस अन् AIMIMच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आलीय.
Akola Mayor Controversy
Akola Mayor ControversySarkarnama
Published on
Updated on

Akola Municipal Corporation : अकोला महापालिकेत बहुमताचा आकाडा गाठत, भाजपने सत्ता मिळवली. महापौर अन् उपमहापौरपद देखील भाजपने पटकावलं. काँग्रेसने सुरूवातीपासून, अकोला महापालिकेत महाविकास आघाडीत सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा करत होती.

पण, सत्तेची गणितं जुळवताना, महाविकास आघाडीला यश आलं नाही. 'AIMIM'ने महापौर अन् उपमहापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली. ही भूमिका भाजपला महापौर अन् उपमहापौरपदाला गवसणी घालण्यासाठी पूरक ठरली. यावरून काँग्रेसचे नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. काँग्रेस अन् 'AIMIM'च्या नगरसेवकांमध्ये चांगलाच राडा झाला. वाद एवढा विकोपाला गेला होती की, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

अकोला महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या (BJP) शारदा खेडकर, तर उपमहापौर पदावर अमोल गोगे विजयी झाले. शारदा खेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उमेदवार सुरेखा काळे यांचा 45 विरुद्ध 32 मतांनी केला पराभव. अमोल गोगे यांनी काँग्रेसच्या आजाद खान यांचा केला 45 विरुद्ध 32 मतांनी पराभव केला.

'AIMIM'चे अकोला महापालिका निवडणुकीत, तीन नगरसेवक निवडून आले आहेत. या दोन्ही निवडीवेळी 'AIMIM'चे नगरसेवक तटस्थ राहिले. यावरून काँग्रेसचे नगरसेवक 'AIMIM'विरुद्ध चांगलेच आक्रमक झाले. सभागृहात 'AIMIM' अन् काँग्रेसचे नगरसेवक एकमेकांना भिडले. यावरून चांगलाच गदारोळ झाला. नगरसेवक एकमेकांवर धावून गेल्याचे देखील चर्चा आहे.

Akola Mayor Controversy
Raigad Khopoli Murder : मंगेश काळोखे हत्या प्रकरण पेटलं! कोटींची सुपारी, हल्लेखोर देवकरांच्या ऑफिसमध्ये? आमदार थोरवेंच्या आरोपांनी राजकारण हादरलं

या निवडणुकीत 'AIMIM'च्या नगरसेवकांनी तटस्थ राहून, भाजपला मदत केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला. महाराष्ट्रात 'AIMIM' भाजपलाच मदत करण्यासाठी उतरली आहे, असा खळबळजनक आरोप पूर्वीपासून होत आहे. यातच या निवडीवेळी 'AIMIM'चे नगरसेवक तटस्थ राहिल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने हे भाजपबरोबर गेल्याचा आरोप काँग्रेसने केला. सत्तेच्या गणितात महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी धोका दिल्याचा निषेध काँग्रेसने निषेध व्यक्त केला.

Akola Mayor Controversy
Konkan BJP Politics : ‘गद्दारां’चा गेम ओव्हर! झेडपी निवडणुकीआधी भाजपचा संघटनेत 'सर्जिकल स्ट्राइक', कोकणात राजकीय भूकंप

काँग्रेस अन् 'AIMIM'चे नगरसेवक सभागृहात एकमेकांना भिडले. यात काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात 'AIMIM'च्या नगरसेवकांवर बांगड्या फेकल्या. या बांगड्या सभागृहात पडलेल्या होत्या. महिला नगरसेवकांनी पर्समधून बांगड्या काढताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या राड्यानंतर पोलिसांनी एंट्री घेतली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर गोंधळ कमी झाला.

'AIMIM'च्या नगरसेवकांनी काँग्रेसच्या या राड्यावरून, गंभीर आरोप केले आहेत. सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी आम्हाला धमक्या दिल्या. काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभागृहात फेकलेल्या बांगड्याचा 'AIMIM'च्या नगरसेवकांनी निषेध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com