Mamata Banerjee 
देश

Mamata Banerjee: निवडणूक रॅलीदरम्यान अचानक असं काही घडलं की CM ममता बॅनर्जींनी प्रचंड घाबरल्या; व्हिडिओ आला समोर

Mamata Banerjee Rally: जलपाईगुडी जिल्ह्यात ममता बॅनर्जी यांच्या पदयात्रेदरम्यान सुरक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला.

Amit Ujagare

Mamata Banerjee Rally : पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून सध्या स्टार प्रचारकांसह, जनतेच्या प्रत्यक्ष गाठीभेटी आणि पायी रॅलीजचं आयोजनही करण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसकडून आयोजित अशाच एका रॅलीमध्ये ममता बॅनर्जींवर एक धक्कादायक प्रसंग ओढवला. यामुळं ममता बॅनर्जी प्रचंड घाबरलेल्या दिसल्या. त्यांच्याभोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांमुळं पुढील धोका टळला.

नेमकं काय घडलं?

जलपाईगुडी जिल्ह्यात ममता बॅनर्जी यांच्या पदयात्रेदरम्यान सुरक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला. ममता बॅनर्जी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या जनतेला अभिवादन करत पुढे चालत असताना अचानक समोरुन एक तरुण थेट ममता बॅनर्जींच्या पायाजवळ येऊन वाकला. त्याचवेळी ममतांच्या सोबत चालणाऱ्या एका महिला सुरक्षा रक्षकाच्या लक्षात ही बाब येताच तीनं ममतांना मागे घेत स्वतः पुढे जात या तरुणाला रोखलं आणि त्याला बाजुला केलं. त्यानंतर इतरही सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. पण याच क्षणी ममता बॅनर्जी मात्र काहीशा हादरलेल्या दिसल्या. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत ममता बॅनर्जी या भीतीनं छातीला हात लावत असताना चेहऱ्यावर बैचेनी स्पष्टपणे दिसून येत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळं त्यांनी काही काळ जागेवरच थांबल्या आणि त्यानंतर पदयात्रा पुन्हा सुरू केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT