

BJP leader killing case verdict: भाजप नेत्याच्या हत्या प्रकरणी काँग्रेसच्या विद्यमान आमदारासह १६ जणांना कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचं वृत्त आहे. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात बंगळुरुतील विशेष कोर्टानं हा निर्णय दिला आहे. यामुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कर्नाटकातील सन २०१६ मधील हे राजकीय हिंसाचाराचं प्रकरण असून भाजप नेते योगेश गोवडा यांच्या हत्या प्रकरणी काँग्रेसचे विद्यमान आमदार विनय कुलकर्णी आणि १६ जणांना विशेष कोर्टानं दोषी ठरवलं असून या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
त्याचबरोबर प्रत्येकाला ३०,००० रुपयाचा दंडही कोर्टानं ठोठावला आहे. विशेष कोर्टाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी कुलकर्णीसहित इतर आरोपींवर बीएनएसच्या कलमांतर्गत दोषी ठरवलं. यामध्ये गुन्हेगारी कट आणि हत्येच्या कलमांचा समावेश आहे.
१५ जून २०१६ रोजी कर्नाटकातील धारवाडमध्ये भाजपच्या जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा गौडर यांची हत्या करण्यात आली होती. सुपारी देऊन धारवाडच्या सप्तपूरमध्ये गौडर यांच्या जीममध्येच त्यांनी हत्या करण्यात आली होती.
गौडर कुटुंबियांच्या आणि इतर लोकांच्या मागणीनंतर तत्कालीन भाजप सरकारनं २०१९ मध्ये हे प्रकरण सीबीआयकडं सोपवलं होतं, सीबीआयनं २०२० मध्ये या खटल्यात एक पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं.
यामध्ये काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी याला प्रमुख आरोपी म्हणून सादर करण्यात आलं होतं. त्यानंतर सीबीआयनं कुलकर्णीला २०२० मध्ये अटक केली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये त्याला सुप्रीम कोर्टाकडून काही अटीशर्तींवर जामीन मिळाला होता. यामध्ये धारवाड जिल्ह्यात प्रवेशावर प्रतिबंध लावण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.