Shevundu Adhikari Sarkarnama
देश

West Bengal cabinet : क्रिकेटचे मैदान गाजवलेला खेळाडूही बंगालच्या मंत्रिमंडळात; 35 नव्या मंत्र्यांचा शपथविधी

Suvendu Adhikari political strategy : पश्चिम बंगालमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून 35 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शुभेंदु अधिकारींची ही मोठी रणनीती मानली जात आहे

Rashmi Mane

West Bengal cabinet reshuffle latest news : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडत राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 35 नव्या मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली. कोलकाता येथील लोक भवनमध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल आर. एन. रवि यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या विस्तारानंतर राज्य मंत्रिमंडळातील सदस्यसंख्या वाढून 41 वर पोहोचली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी आणि पश्चिम बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नव्या मंत्र्यांची यादी अंतिम केली होती. त्यानुसार भाजपच्या 35 आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. नव्या मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा देखील लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात अर्जुन सिंह, तापस रॉय, शरदवत मुखर्जी, जगन्नाथ चट्टोपाध्याय आणि शंकर घोष यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर दीपक बर्मन, मनोज उरांव आणि गौरी शंकर घोष यांच्यासह अनेक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.

या विस्तारात माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा यांनाही मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्यासोबत स्वपन दासगुप्ता, दुध कुमार मंडल, जोएल मुर्मू आणि आनंदमय बर्मन यांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली. तसेच कौशिक चौधरी, गार्गी दास घोष, भास्कर भट्टाचार्य, दिबाकर घरामी आणि सुमना सरकार यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

राज्य मंत्रिपदासोबत स्वतंत्र प्रभाराची जबाबदारीही काही नेत्यांना देण्यात आली आहे. मालती रावा रॉय, राजेश महतो आणि इंद्रनील खान यांनी स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. याशिवाय शांतनू प्रामाणिक, पूर्णिमा चक्रवर्ती आणि उमेश राय यांनाही राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली.

यापूर्वी 9 मे रोजी स्थापन झालेल्या भाजप सरकारमध्ये 6 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. त्यामध्ये मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्यासह अग्निमित्रा पॉल, दिलीप घोष, निसिथ प्रमाणिक, अशोक कीर्तनिया आणि खुदीराम टुडू यांचा समावेश होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT