Mamata Banerjee Sarkarnama
देश

CM Mamata Banerjee : ममता बॅनर्जी थोडक्यात बचावल्या; वाहन अपघातात डोक्याला दुखापत

Car Accident : ममतांच्या वाहनांच्या ताफ्यात खासगी वाहनाची घुसखोरी...

Rajanand More

West Bengal News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ममतांच्या वाहनांच्या ताफ्यात दुसऱ्या वाहनाने अचानक घुसखोरी केल्याने अपघात झाल्याचे समजते.

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या वाहनांचा ताफा वर्धमान येथून कोलकाताच्या दिशेने निघाला होता. नियोजनानुसार त्या हेलिकॉप्टरने कोलकाताकडे (Kolkata) जाणार होत्या. पण पावसामुळे ममतांचा ताफा रस्त्याने निघाला होता. त्यातच धुके असल्यामुळे चालक वाहन चालवताना अडचणी येत होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एक अज्ञात वाहन अचानक ममतांच्या वाहनासमोर आल्याने चालकाने ब्रेक लावला. त्यामुळे ममतांच्या डोक्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर नसल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT