Delhi News : सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांची 'इंडिया' आघाडीच्या (India Alliance) जागावाटपांवरुन घमासान घडून येत आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने जागावाटपाबाबत मित्रपक्षांच्या अपेक्षा विचारात घेता, जागावाटपाबाबत सावध भूमिका घेत आहे. पण, आघाडीतल्या घटकपक्षांनी काँग्रेसवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जागांसाठी दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे आघाडीतल्या जागावाटपात घमासान घडून येण्याची चिन्हे दिसत आहेत. (Latest Marathi News)
देशातील सर्वात जुन्या पक्षाने जागावाटपाबाबत नमते घेऊन लवचिकता दाखवावी, अशी भूमिका घटक पक्षांची आहे. जनता दल (युनायटेड) अध्यक्ष, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची इंडिया आघाडीला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय राजकारणातील ते अनुभवी नेते आहेत. जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत इंडिया आघाडीतील मोठ्या पक्षांनी आघाडीच्या यशस्वीतेसाठी मोठे मन दाखवावे, असे त्यांनी काँग्रेसकडे बोट दाखवत, सूचकपणे म्हटले होते.
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 23 जागा लढवणार असल्याचा आग्रह धरला आहे. यापूर्वी शिवसेनेने जिंकलेल्या जागांवर चर्चा किंवा तडजोड होऊच शकत नाही, अशी भूमिका ठाकरे गटाची आहे. तर याउलट 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने एकच जागा जिंकली आहे. यामुळे काँग्रेसला जास्त जागा देण्यात महाविकास आघाडीतील इतर नेत्यांची मानसिकता दिसत नाही.
इंडिया आघाडीतील या दोन्ही मोठ्या घटकपक्षांची ही ताठर भूमिका जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? हा प्रश्न असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली. तृणमूल हा एकच पक्ष बंगालमध्ये भाजपशी टक्कर देण्यास सक्षम आहे. बॅनर्जी गुरुवारी पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेत म्हणाल्या, इंडिया आघाडी देशभरात भाजपचा सामना करेल, परंतु पश्चिम बंगालमध्ये भाजपविरुद्धच्या लढाई तृणमूलच करणार आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भूपेश बघेल, मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद आणि मोहन प्रकाश हे इंडिया आघाडीतील काँग्रेसच्या पाच सदस्यीय समितीचा भाग आहेत, यांनी अनेक राज्यांच्या नेत्यांची भेट घेतली. त्यात दिल्ली, बिहार आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. यावेळी जागावाटपाबाबत त्यांची चर्चा सुरु असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.