West Bengal Chief Secretary meets Governor Jagdeep Dhakhar  Sarkarnama
देश

राजकारण तापलं! मुख्य सचिव थेट राजभवनावर राज्यपालांच्या भेटीला

राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष आता टोकाला पोचला असून, राजकीय वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. यामुळे राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन (Assembly Session) अचानक तहकूब केले होते. त्यानंतर राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन चक्क पहाटे 2 वाजताच बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर मोठी घडामोडी सुरू झाल्या असून, मुख्य सचिवांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली.

मुख्य सचिव हरीकृष्ण द्विवेदी यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल जगदीप धनखर यांची भेट घेतली. राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन मध्यरात्री 2 वाजता बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यावर मुख्य सचिवांनी राज्यपालांशी चर्चा केली असल्याचे समजते. राज्य मंत्रिमंडळाने विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याबाबत 28 फेब्रुवारीला निर्णय घेतला असून, याची माहिती मुख्य सचिवांनी राज्यपालांना दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पश्चिम बंगाल सरकारने विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यासाठी राज्यपालांना समंतीसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावामध्ये टायपिंगच्या चुकीमुळे 7 मार्च रोजी 2 पीएमऐवजी 2 एम असे टाईप करण्यात आले होते. त्या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता विधानसभेचे अधिवेशन 7 मार्चला मध्यरात्री 2 वाजता होणार आहे. विधानसभेचे अधिवेशन सुरू करण्यासाठी राज्यपाल जगदीप धनखर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र उच्चपदस्थ अधिकारी हे राज्यपालांपर्यंत पोहोचले नाही. यानंतर राज्यपालांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला परवानगी दिल्याचे सांगितले. मात्र, रात्री दोन वाजता अधिवेशन सुरू करण्याचा हा प्रस्ताव त्यांना अनैसर्गिक वाटत होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी यावर म्हटले की, ही टाईपिंगची चुकी आहे. राज्यपालांना ती चुक दुरुस्त करता आली असती. मात्र, त्यांनी झालेली चुक मान्य केल्याने आता विधानसभेचे अधिवेशन हे रात्रीच सुरू होणार आहे. बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, राज्य सरकारने पाठवलेल्या पहिल्या दोन नोट्समध्ये ते दुपारी 2:00 वाजता लिहिले होते. मात्र, त्याठीकानी चुकिने पहाटे 2:00 पर्यंत झाले. राज्यपाल त्याकडे दुर्लक्ष करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही.

त्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभेचे कामकाज पहाटे 2:00 वाजता सुरू झाले, तर देशातील अशा प्रकारची ही एक अनोखी घटना असेल, असेही राज्यपालांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारताना राज्यपाल यांनी राज्यघटनेचे कलम 174 अन्वये सोमवारी म्हणजेच 7 मार्च रोजी पहाटे 2 वाजता (2 AM) राज्य विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याचे राजभवनाच्या वतीने सांगितले आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT