राज्यपालांच्या विरोधात आंदोलन महागात; शिवसेना शहरप्रमुखांसह 8 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
Shivsena
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

सोलापूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा एकेरी उल्लेख करत रामदास स्वामी नसते तर शिवाजीला कोण विचारले असते? असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, त्यांची राज्यपालपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी होत आहे. आता राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करणे शिवसेनेला (Shivsena) महागात पडले आहे.

राज्यपालांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी राज्यपालांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा धिक्कार असो, अशा घोषणाही देण्यात आल्या. हे आंदोलन आता शिवसेनेला महागात पडले आहे. बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 8 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. यात जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांचा समावेश आहे.

Shivsena
युक्रेनहून परतलेल्या भारतीयांच्या स्वागताला राणे गेले अन् शिवसेनेवर तोफ डागून आले

कोश्यारींची सारवासारव

दरम्यान, या वादावर राज्यपालांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे प्रेरणास्त्रोत आहे. मला त्यांच्याबद्दल जितकी माहिती होती, त्यानुसार मला असे वाटले की समर्थ रामदास हे त्यांचे गुरू आहेत. त्यामुळे मी हा संदर्भ दिला. मात्र, याबाबत काही जणांनी मला काही तथ्य सांगितले. त्या तथ्याची मी माहिती घेणार आहे.

Shivsena
रशिया-युक्रेनच्या युद्धात जगातील सर्वांत मोठे विमान उध्वस्त

कोश्यारी यांच्या वक्तव्यावर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत असून त्यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी राज्यभरातील शिवप्रेमींकडून व महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी गुरुविषयीचे महत्व सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. गुरुमुळे शिष्य घडत असतो असे सांगताना महाराजांचा एकेरी उल्लेख करत समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारलं असतं असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com