Mamata Banerjee Rajeev Kumar Sarkarnama
देश

Mamata Banerjee : ममतांचा बेधडक निर्णय; आयोगाने हटवलेल्या IPS अधिकाऱ्यावरच पुन्हा मोठी जबाबदारी

West Bengal DGP Rajeev Kumar Sanjay Mukherjee Election Commission : लोकसभा निवडणुकीवेळी राजीव कुमार यांची पोलिस महासंचालक पदावरून बदली करण्यात आली होती.

Rajanand More

New Delhi : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आपल्या बेधडक निर्णयांमुळे सातत्याने प्रकाशझोतात असतात. पुन्हा एकदा त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भाजपकडून टीकास्त्र सोडले जाऊ शकते. लोकसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाने पोलिस महासंचालक पदावरून हटवलेल्या अधिकाऱ्यालाच ममतांनी पुन्हा आणले आहे.

ममता बॅनर्जी सरकारने आयपीएस राजीव कुमार यांना पुन्हा राज्याचे पोलिस महासंचालक हे महत्वाचे दिले आहे. तसा आदेश सोमवारी काढण्यात आला. तर विद्यमान डीजीपी संजय मुखर्जी यांना फायर विभागाचे डीजी बनवण्यात आले आहे. राजीव कुमार हे ममतांचे सर्वात विश्वासू अधिकारी म्हणून ओळखले जातात.

लोकसभा निवडणुकीच्या काळात आयोगाने राजीव कुमार यांना हटवले होते. निवडणुकीशी संबंध नसलेल्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ममता सरकारने त्यांना 31 डिसेंबर 2023 ला डीजीपी केले होते. आता निवडणुका उरकल्यानंतर ममता सरकारने पुन्हा एकदा राजीव कुमार यांना त्याच पदावर आणले आहे.

डिसेंबरमध्ये राजीव कुमार यांना डीजीपी बनवल्यानंतर भाजपने ममता सरकारवर टीका केली होती. ममतांच्या सेवकाला पोलिस महासंचालक बनवल्याचा आरोप भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी केला होता. राजीव कुमार यांनी शारदा चिट फंडचे मालक सुदिप्तो सेन यांची सर्व उपकरणे नष्ट केली होती. सीबीआयला ही उपकरणे मिळाली असती तर ममता बॅनर्जी जेलमध्ये असत्या, असे अधिकारी म्हणाले होते.

राजीव कुमार हे बंगाल केजरचे 1989 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. सीबीआयने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शारदा चिट फंड घोटाळाप्रकरणी चौकशीदरम्यान पुरावे नष्ट करणे आणि लपवण्याचा आरोप त्यांच्यावर जाला होता. या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT