New Delhi : भाजपच्या नवे राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल, यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत अध्यक्षांची निवड होईल, अशी चर्चा असली तरी पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण ही निवड कशी होते, त्यासाठी कोणत्या अटी आहेत, कोण अध्यक्ष बनू शकते, ही माहिती आपण जाणून घेऊयात...
भाजपच्या घटनेतील कलम 19 नुसार राष्ट्रीय अध्यक्षांची निवडप्रक्रिया होते. पक्षाचे एक निवड मंडळ असते. त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य असतात. 20 सदस्यांच्या निवड मंडळामध्ये अध्यक्षपदासाठी योग्य असलेल्या व्यक्तीच्या नावाचा प्रस्ताव मांडला जातो. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होते.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संबंधित व्यक्ती पक्षातील सक्रीय सदस्य असायला हवी. कलम 19 नुसार संबंधित व्यक्ती कमीत कमी 15 वर्षे प्राथमिक सदस्य असणे आवश्यक आहे. तर कमीत कमी चार टर्म सक्रीय सदस्य होणे गरजेचे असते. त्यानंतरच उमेदवारीला मान्यता दिली जाते.
भाजपच्या घटनेतील कलम 12 नुसार कमीत कमी तीन वर्षे पक्षाचा सदस्य असलेल्या व्यक्तीला सक्रीय सदस्य मानले जाते. सदस्य बनण्यासाटी शंभर रुपये पक्षाला शंभर रुपयांचा निधी देण्याबरोबरच जिल्हा कार्यालयात अर्ज करावा लागतो. पक्षाने सक्रीय सदस्यत्वाचा अर्ज नाकारल्यास हे पैसे परत मिळत नाहीत.
सक्रीय सदस्य बनल्यानंतरच सदस्याला मंडल समिती किंवा त्यापेक्षा वरिष्ठ समित्यांची निवडणूक लढवू शकतो. दर सहा वर्षांनी सदस्यत्वाचे नुतणीकरण करावे लागते. ठराविक अंतराने सदस्यांना पुन्हा सदस्यत्वाचा अर्ज भरावा लागतो. शंभर रुपये भरल्याशिवाय सदस्यत्व मिळत नाही आणि त्याशिवाय कोणत्याही निवडीस पात्र ठरत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.