Ram Temple, CM Mamata Banerjee Sarkarnama
देश

Ram Mandir News : राम मंदिराबाबत ममतादीदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Rajanand More

Ram Mandir Inauguration : अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात अजून 22 जानेवारीला रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. मात्र, त्यावरून जोरदार राजकारणही सुरू झाले आहे. भाजपने या सोहळ्याचा राजकीय इव्हेंट केल्याची टीका करत काही राजकीय नेत्यांनी या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) (CPI) वरिष्ठ नेत्या वृंदा कारत (Brinda Karat) यांनी आपल्या पक्षाचा प्रतिनिधी या सोहळ्याला जाणार नसल्याची घोषणा मंगळवारी केली आहे. आमचा पक्ष धार्मिक भावनांचा आदर करतो. पण भाजपकडून (BJP) या भावनांचे राजकारण (Politics) केले जात आहे. हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यानंतर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही (Mamata Banerjee) याबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांच्याकडून सोहळ्याला तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाच्या एकही प्रतिनिधी पाठवला जाणार नसल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांच्याकडूनही भाजपकडे बोट दाखवले जात आहे. याबाबत तृणमूलकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत भाजपचा राजकीय हेतू स्पष्ट आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून याचा पुरेपूर वापर करून घेतला जाणार आहे. त्यामुळे पक्षाकडून या सोहळयाला प्रतिनिधी पाठवला जाणार नसल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे.

राम मंदिर ट्रस्टकडून देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांसह बड्या राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवले जात आहे. काही नेत्यांना निमंत्रण मिळालेही असून त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. महाराष्ट्रात अद्याप उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांना निमंत्रण मिळाले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT