West Bengal BJP CM face discussion: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ऐतिहासिक विजयाने आता मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यात पहिल्यांदाच सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा मोठा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
या शर्यतीत विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांचे नाव सर्वात आघाडीवर मानले जात आहे. बंगालमध्ये भाजपची ताकद वाढवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. मात्र, या रेसमध्ये इतरही नावेही आहेत.
माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh), सध्याचे प्रदेशाध्यक्ष शामिक भट्टाचार्य (Samik Bhattacharya), उत्पल ब्रह्मचरराव आणि स्वप्न दासगुप्ता, रुपा गांगुली (Rupa Ganguly) आणि अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांची नावे चर्चेत आहेत.
मुख्यमंत्री पदाच्या या शर्यतीत सुभेंदू अधिकारी यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दोन जागांवर विजय मिळवणे आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव करणे—या दोन मोठ्या कारणांमुळे त्यांची दावेदारी मजबूत मानली जाते.
भाजपमधील सूत्रांच्या माहितीनुसार, उमेदवारी अर्ज भरताना अमित शाह स्वतः शुभेंदू अधिकारी यांच्या सोबत होते. त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवत असल्याचे संकेत मिळत आहेत. बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला असून, मुख्यमंत्रीपदाच्या निवडीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीपूर्वी अमित शाह यांनी “बंगालचा मुख्यमंत्री बंगालीच असेल” असे स्पष्ट सांगत विरोधकांच्या ‘बाहेरचा CM’ या मुद्द्याला थेट उत्तर दिले होते. या भूमिकेमुळे आता CM निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ९ मे रोजी नवीन सरकारचा शपथविधी होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लवकरच नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीसाठी कोलकाता येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.